टी20 विश्वचषकातील एकाच संघातील दोन फिनिशरला घाबरला इरफान, म्हणाला...
T20 World Cup 2024 : आयपीएलमध्ये जगभरातील क्रिकेटर आपली चमक दाखवत आहेत, ते चौकार षटकारांचा पाऊस पाडत आहे.

T20 World Cup 2024 : आयपीएलमध्ये जगभरातील क्रिकेटर आपली चमक दाखवत आहेत, ते चौकार षटकारांचा पाऊस पाडत आहे. यामध्ये हैदराबादचा हेनरिक क्लासेन आणि दिल्लीच्या ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू दक्षिण आफ्रिकेचे आहेत. यंदाच्या विश्वचषकात या दोन्ही फलंदाजांची प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरली असेलच. जोन जूनमध्ये टी20 विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु होत आहे. या विश्वचषकात फिनिशरची सर्वाधिक चर्चा होईल, असा अंदाच समालोचकांनी व्यक्त केलाय. त्यामध्ये हेनरिक क्लासेन आणि स्टब्स यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या दोन धाकड फलंदाजाबाबत इरफान पठाण यानं मोठं वक्तव्य केलेय. इरफान पठाणच्या मते क्लासेन आणि स्टब्स यांच्या फिनिशिंगची भिती वाटतेय.
हेनरिक क्लासेन आणि ट्रिस्टन स्टब्स यांना दक्षिण आफ्रिकेच्या टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान दिलेय. क्लासेन आणि स्टब्स अखेरच्या षटकात फलंदाजी करत असतील, तर प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडणार आहे, असे इरफान पठाण म्हणालाय. इरफान पठाण याच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. कुणी भारताचे खेळाडू त्याला सांगत आहेत, तर कोण इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची आठवण करुन देत आहेत.
इरफान पठाण याचं ट्वीट सध्या चर्चेत आहे. इरफान पठाण यानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की," अखेरच्या पाच षटकामध्ये हेनरिक क्लासेन आणि ट्रेस्टन स्टब्स फलंदाजी करत असतील, तर ते खरच खूपच भितीदायक आहे. " हेनरिक क्लासेन यानं यंदाच्या आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. त्याने 11 सामन्यात 42 च्या सरासरीने 339 धावा चोपल्या आहेत. तो अखेरच्या दहा षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पिसे काढतो. त्याने 11 सामन्यात तब्बल 36 षटकार ठोकले आहेत. म्हणजे सामन्याला सरासरी तीन ते चार षटकार मारतोच. तर दिल्लीकडून खेळणाऱ्या स्टब्सने 12 सामन्यात 318 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 22 षटकार आणि 21 चौकार ठोकले आहेत. स्टब्सही अखेरच्या पाच ते सहा षटकातच फलंदाजीला उतरतो. डेथ ओव्हरमध्ये स्टब्स चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतो.
Imagine Klassen and Stubbs batting in the last 5 overs for South Africa in the World Cup. Scary thought.
— Irfan Pathan (@IrfanPathan) May 7, 2024
ग्रुप ड मध्ये दक्षिण आफ्रिका संघ -
यंदाचा टी20 विश्वचषकाचा थरार 20 संघामध्ये होणार आहे. सर्व संघाना चार ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये पाच पाच संघ ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ग्रुप ड मध्ये ठेवण्यात आले आहे. दक्षिण आप्रिकाशिवाय या ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना तीन जून रोजी श्रीलंकाविरोधात होणार आहे. ग्रुप ड मधील संघ पाहाता दक्षिण आफ्रिकेचा संघ आरामात सुपर 4 मध्ये प्रवेश करु शकतो.





















