तेवतियाने शेल्डॉन कॉट्रेलला पाच षटकार ठोकले तेव्हाच त्याच आयपीएल स्पर्धा गाजवणं निश्चित झालं होतं : सुनील गावस्कर
माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाचं कौतुक करत त्याच्या 2020 सालच्या शारजाहतील खेळीची आठवण काढली आहे.
Sunil Gavaskar on Rahul Tewatia : भारतीय क्रिकेटमध्ये अलीकडे अनेक युवा खेळाडूंनी आपला जलवा दाखवला असून यातीलच एक नाव म्हणजे राहुल तेवतिया (Rahul Tewatia). मागील काही काळात राहुलने आयपीएल सामन्यांमध्ये केलेल्या दमदार खेळीमुळे त्याचं कौतुक होत आहे. राजस्थानसाठी काही अशक्य सामने जिंकवून दिल्यानंतर यंदा राहुल गुजरात टायटन्स संघात आला असून त्यातही कमाल कामगिरी करत आहे. गुजरातचा संघही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दरम्यान राहुलच्या या सर्व कामगिरीबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी आपलं मत देत राहुलने ज्यावेळी एका षटकात शेल्डॉन कॉट्रेलला पाच षटकार ठोकले होते, त्याच वेळी तो एक मोठ्या सामन्यांसाठीचा खेळाडू आहे, हे सिद्ध झालं होतं. असं म्हटलं आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह कार्यक्रमात बोलताना गावस्कर म्हणाले,''शारजाहच्या मैदानात राहुलने शेल्डॉन कॉट्रेलला ठोकलेल्या पाच षटकारांमुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. त्याचं अवघड आणि अडचणीच्या काळात ही डोकं शांत ठेवून खेळणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे.''
''तेवतिया म्हणजे आईस मॅन''
राहुल अडचणीच्या आणि तणावाच्या खेळीमध्येही डोकं शांत ठेवून खेळी करत असतो. तो परिस्थितीनुसार अगदी रचनात्मक खेळी करत असतो. त्याला कधी कोणता शॉट खेळायचा आणि किती धावा घ्यायच्या हे माहित असतं. त्यामुळे त्याच्या या शांत आणि अडचणीतही थंड डोकं ठेवून खेळण्याच्या कलेमुळे सुनील गावस्कर यांनी त्याला आईस मॅन (Ice Man) अशी पदवी देखील दिली आहे.
हे देखील वाचा-
- KKR Vs RR: नितीश राणा, रिंकू सिंहची दमदार कामगिरी; कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
- IPL 2022 : आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित?
- KKR vs RR : हातावर आधी 50 लिहिलं, मैदानात उतरुन मॅचविनर ठरला, रिंकू सिंहच्या भविष्यवाणीचा Video