(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR Vs SRH: आयपीएल संपत आलं, कोलकात्याला अजूनही सलामी जोडी सापडेना; संघात आतापर्यंत 'इतके' बदल
IPL 2022: यंदाच्या आयपीएलमधील आज पार पडणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.
IPL 2022: यंदाच्या आयपीएलमधील आज पार पडणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद (KKR vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. कोलकाता सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. तर, आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे. अजूनही हैदराबादच्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. यासाठी, हैदराबादला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे. यंदाच्या हंगामात कोलकात्यानं आतापर्यंत संघात अनेक बदल केले आहेत. विशेष म्हणजे, कोलकात्याच्या संघाला अजूनही सलामीवीर जोडी सापडली नसून त्यांनी संघात पाच वेळा सलामी जोडी बदलली आहे.
दरम्यान, यंदाच्या हंगामात कोलकात्यानं पाच वेळा सलामी जोडी बदलली आहे. व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणनं सर्वाधिक वेळा म्हणजेच सहा वेळा संघाला सलामी दिली आहे. त्यानंतर आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीत यांनी दोन वेळा, आरोन फिंच आणि व्यंकटेश अय्यरनं दोन वेळा, सॅम बिलिंग्स सुनील नारायण एक वेळा, आरोन फिंच आणि सुनील नारायण यांनी एक वेळा संघासाठी सलामी दिली आहे.
यंदाच्या हंगामात कोलकात्यासाठी सलामी देणारी जोडी-
क्र. | सलामी जोडी | किती वेळा |
1) | व्यंकटेश अय्यर- अजिंक्य रहाणे | 6 |
2) | आरोन फिंच- बाबा इंद्रजीत | 2 |
3) | आरोन फिंच- व्यंकटेश अय्यर | 2 |
4) | सॅम बिलिंग्स- सुनील नारायण | 1 |
5) | आरोन फिंच- सुनील नारायण | 1 |
कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ 22 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता कोलकात्याचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर हैदराबादने 8 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
संघ-
कोलकात्याचा प्लेईंग इलेव्हन-
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.
हैदराबादचा प्लेईंग इलेव्हन-
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
हे देखील वाचा-