एक्स्प्लोर

KKR vs RCB, IPL 2023 Live : आरसीबीचा दारुण पराभव, कोलकात्याने विजयाचे खाते उघडले

KKR vs RCB Match : आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल.

LIVE

Key Events
KKR vs RCB, IPL 2023 Live : आरसीबीचा दारुण पराभव, कोलकात्याने विजयाचे खाते उघडले

Background

IPL 2023, Match 9, KKR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यात आज सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघांचा आज यंदाच्या मोसमातील (IPL 2023) दुसरा सामना असेल. याआधीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल. आयपीएल 2023 मध्ये याआधीच्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

IPL 2023, RCB vs KKR Match Preview : आरसीबी आणि कोलकाता यांच्यात लढत
कोलकाता नाईट रायडर्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयासाठी तयारी करत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडिअमवर हा बहुप्रतीक्षित सामना होणार आहे. कोलकाताला यंदाच्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला.

दुसरीकडे, बंगळुरू संघाने त्यांच्या आयपीएल 2023 च्या प्रवासाची विजयी सुरुवात केली. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. विराट कोहली हा सामन्याचा हिरो ठरला. कोहलीने शानदार 82 धावांची नाबाद खेळी करून बंगळुरूला विजय मिळवून दिला.

RCB vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड?
आरसीबी आणि कोलकाता यांच्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ ठरला आहे. कोलताताने 30 पैकी 16 सामने जिंकले तर, बंगळुरुला 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघानी सर्वाधिक 200 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.

कधी आणि कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यातील सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

22:54 PM (IST)  •  06 Apr 2023

कोलकात्याची विजयाकडे आगेकूच

कोलकात्याची विजयाकडे आगेकूच.. आरसीबीचे 8 गडी तंबूत

22:19 PM (IST)  •  06 Apr 2023

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत

आरसीबीचा अर्धा संघ तंबूत... आता शाहबाज अहमद बाद

22:13 PM (IST)  •  06 Apr 2023

चक्रवर्तीच्या जाळ्यात अडकली आरसीबी

वरुण चक्रवर्तीचा भेदक मारा.. आरसीबीच्या तिसऱ्या फलंदाजाला तंबूत पाठवले. 

22:12 PM (IST)  •  06 Apr 2023

केजीएफ बाद, आरसीबीची फंलदाजी ढेफाळली

कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस स्वस्तात बाद झाले आहेत. आरसीबीची फंलदाजी ढासळली. 

22:03 PM (IST)  •  06 Apr 2023

आरसीबीला दुसरा धक्का, फाफ तंबूत

विराट कोहलीनंतर कर्णधार फाफ डु प्लेसिसही बाद झाला. आरसीबीला दुसरा धक्का बसलाय. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget