एक्स्प्लोर

पूरनचे वादळी अर्धशतक, लखनौचे कोलकात्यासमोर 177 धावांचे आव्हान

KKR vs LSG, IPL 2023 : निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षठकात आठ विकेटच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत मजल मारली.

KKR vs LSG, IPL 2023 : निकोलस पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर लखनौने निर्धारित 20 षठकात आठ विकेटच्या मोबदल्यात 176 धावांपर्यंत मजल मारली. निकोलस पूरनचा अपवाद वगळता इतर एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. कोलकात्याकडून सुनील नारायण याने भेदक मारा केला. नारायण याने दोन विकेट घेतल्या. कोलकात्याला विजयासाठी 177 धावांचे आव्हान आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज करण शर्मा तीन धावांवर तंबूत परतला. हर्षित राणा याने लखनौला पहिला धक्का दिला. क्विंटन डिकॉक आणि प्रेरक राणा यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला. दोघांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या हालती ठेवली.  दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूत 41 धावांची भागिदारी केली. प्रेरक मांकड याने 20 चेंडूत 26 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. प्रेरक मांकड बाद झाल्यानंतर स्टॉयनिसही तंबूत परतला. स्टॉयनिस याला खातेही उघडता आले नाही. वैभव अरोरा याने या दोघांना लागोपाठ तंबूत पाठवले.  कर्णधार कृणाल पांड्याही लगेच तंबूत परतला. कृणाल पांड्या याला फक्त 9 धावांची खेळी करता आली. यामध्ये त्याने एक षटकार लगावला. एका बाजूने जम बसेलला क्विंटन डि कॉक यानेही आपली विकेट फेकली. डि कॉक याने 27 चेंडूत 28 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. 

73 धावांमध्ये लखनौचा अर्धा संघ तंबूत परतला होता. लखनौची फलंदाजी ढेपाळली असे वाटले... पण निकोलस पूरन आणि आयुष बडोनी यांनी लखनौचा डाव सावरला. दोघांनी वादळी फलंदाजी करत लखनौची धावसंख्या वाढवली. निकोलस पूरन याने अर्धशतक झळकावले.. तर आयुष बडोनी याने 25 धावांची छोटेखानी खेळी केली. आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांनी अर्दशतकी भागिदारी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळेच लखनौची धावसंख्या 176 पर्यंत पोहचली. 

निकोलस पूरन याने 30 चेंडूत 58 धावांची खेली केली. या खेळीमध्ये त्याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. निकोलस पूरन याच्या फटकेबाजीपुढे कोलकात्याची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. आयुष बडोनी याने एक षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. अखेरीस कृष्णप्पा गौतम याने 4 चेंडूत 11 धावांचे योगदान दिले. 

कोकात्याकडजून वैभव आरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget