KKR vs LSG: क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, केएल राहुलचं तुफानी अर्धशतक; लखनौचं कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य
KKR vs LSG: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) सुरु असलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत 68 धावा कुटल्या.
![KKR vs LSG: क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, केएल राहुलचं तुफानी अर्धशतक; लखनौचं कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य KKR vs LSG, IPL 2022: Quinton de Kock, KL Rahul, Lucknow Super Giants won the toss and Choose Bat First against Kolkata Knight Riders KKR vs LSG: क्विंटन डी कॉकची वादळी खेळी, केएल राहुलचं तुफानी अर्धशतक; लखनौचं कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/18/fc44f475d88790e47b2e3bb1b7eadcb6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KKR vs LSG, IPL 2022: लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं (Quinton de Kock) आणि कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) कोलकात्याविरुद्ध वादळी खेळी केली. या सामन्यात दोघांनीही कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नवी मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) सुरु असलेल्या या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत 140 धावा ठोकल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत 68 धावा कुटल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर लखनौच्या संघानं 20 षटकात एकही विकेट न गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं लक्ष्य ठवलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असून कोणता संघ जिंकणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
कोलकात्याविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलनं घेतलेला निर्णय लखौनच्या बाजूनं योग्य ठरल्याचं दिसतंय. लखनौकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलं तुफानी फलंदाजी करत संघाचा डाव 210 वर नेला. या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. या खेळीसह दोन्ही खेळाडूंनी अनेक विक्रमाला गवसणी घातली. कोलकात्यासाठी टीम साऊथी सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यानं चार षटकात 14.20 च्या सरासरीनं 57 धावा दिल्या आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन:
व्यंकटेश अय्यर, अभिजीत तोमर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकिपर), रिंकू सिंह, आंद्रे रसल, सुनील नरायण, उमेश यादव, टीम साऊथी, वरुण चक्रवर्ती.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), केएल राहुल (कर्णधार), एव्हिन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)