एक्स्प्लोर

आयपीएल लिलावात गोलंदाज होणार मालामाल, पाच जणांवर दहा संघाच्या नजरा

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे.  रिलिज आणि रिटेन खेळाडू जाहीर केल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लिलावावर खिळल्या आहेत.

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी सर्व दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे.  रिलिज आणि रिटेन खेळाडू जाहीर केल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लिलावावर खिळल्या आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंना दहा संघांनी डच्चू दिलाय, त्यामुळे लिलावात तगडे गोलंदाजही असतील. या गोलंदाजांना लिलावात तगडी बोली लागू शकते. पाहूयात अशाच काही गोलंदाजांबद्दल... 

जोफ्रा आर्चर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मुंबईने रिलिज केले होते. जोफ्रा आर्चर अखेरच्या षटकात यॉर्कर चेंडू टाकण्यात पटाईत आहे. लिलावात सर्वच संघाची नजर जोफ्रावर असेल. 

मिचेल स्टार्क

2015 पासून मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळला नाही. नुकताच झालेला विश्वचषकात मिचेल स्टार्कसाठी शानदार होता.  यंदाच्या लिलावात मिचेल स्टार्कचे नाव निश्चित मानले जातेय. डावखुऱ्या मिचेल स्टार्कवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 
 
लॉकी फर्ग्यूसन

कोलकाता नाइट रायडर्सने न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला रिलिज केलेय. आयपीएलमध्ये लॉकी फर्गुसन याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. याआधी गुजरात आणि पुण्याच्या संघाचा सदस्य होता. वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्गुसनला ओळखले जातेय. त्याला घेण्यासाठी आयपीएल लिलावात चुरस पाहायला मिळेल. 

 गेराल्ड कोएत्जी

भारतात झालेल्या विश्वचषकात गेराल्ड कोएत्जी याने आफ्रिकेसाठी शानदार गोलंदाजी केली होती. त्याशिवाय अखेरच्या षकात फलंदाजीही करु शकतो. गेराल्डने 14 वनडे सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. लिलिवात सर्व संघाच्या नजरा आफ्रिकेच्या गेराल्ड कोएत्जी याच्याकडे असतील. 23 वर्षीय खेळाडूवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 

जोश हेजलवूड

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा आरसीबीचा सदस्य होता. त्याला रिलिज करण्यात आलेय. हेजलवूड लाईन अन् लेंथसाठी ओळखलं जातं. हेजलवूड लिलावात उतरणार असल्यामुळे सर्व संघाच्या नजरा त्याच्यावर असतील.  

आयपीएल लिलाव कधी आणि कुठे होणार?

IPL 2024 साठी 19 डिसेंबर रोजी लिलाव होणार आहे. हा लिलाव दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल लिलाव भारताऐवजी विदेशात आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन 2023 च्या आयपीएलसाठी सर्वात महागडा खेळाडू होता, त्याला पंजाब किंग्जने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता या वेळी कोणत्या खेळाडूला सर्वात महागडी बोली लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहेत. मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त फक्त चेन्नई सुपर किंग्जलाच 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखलABP Majha Headlines :  9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
Embed widget