IPL Auction 2023 : नवखा हॅरी ब्रूक 13.25 कोटींना सोल्ड, तर अनुभवी अजिंक्य रहाणेला मिळाले अवघे 50 लाख
IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शन (IPL 2023 Mini Auction) कोची येथे सुरु झाला असून अगदी नवनवीन निकाल लागताना दिसत आहेत.
![IPL Auction 2023 : नवखा हॅरी ब्रूक 13.25 कोटींना सोल्ड, तर अनुभवी अजिंक्य रहाणेला मिळाले अवघे 50 लाख IPL Player Auction 2023 Live SRH bought Harry Brook for 13.25 crore where ajinkya rahane sold to CSK for 50 lakh Mayank agarwal sold to SRH IPL Auction 2023 : नवखा हॅरी ब्रूक 13.25 कोटींना सोल्ड, तर अनुभवी अजिंक्य रहाणेला मिळाले अवघे 50 लाख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2017/03/28123424/1144.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL Mini Auction 2023 Live: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या हंगामासाठी लिलाव सुरु झाला असून अगदी नवनवीन निकाल लागताना दिसत आहेत. इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रुकला (Harru Brook) तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबादने (SRH) विकत घेतलं आहे. तर एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या अनुभवी अजिंक्य रहाणेला केवळ 50 लाखांना चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं आहे. याशिवाय पंजाब किंग्सचा माजी कर्णधार मयांक अगरवाल याला देखील सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटींना विकत घेतलं आहे. तर केन विल्यमसन 2 कोटींच्या बेस प्राईसमध्ये गुजरात टायटन्सकडे गेला आहे.
इंग्लंडच्या हॅरीने आपल्या छोट्या कारकिर्दीत देखील कमाल कामगिरी केली आहे. अलीकडेच, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्येही त्याने वेगवान पद्धतीनं तीन शतकं झळकावली. आयपीएलमध्ये अनेक संघांना त्यांच्या मधल्या फळीत अशा दमदार फलंदाजीची गरज असल्याने हॅरीवर तगडी बोली लागली जी अखेर हैदराबादने 13.25 कोटींना जिंकली आहे. दुसरीकडे अजिंक्य रहाणे मात्र मागील काही वर्षात खराब फॉर्मशी झुंजत आहे. कसोटीमध्ये स्पेशन फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जात होतं. पण आता कसोटी संघातही त्याला जागा मिळत नसल्याने यंदा तो अनसोल्ड राहील असं वाटत होतं. पण 50 लाखांना चेन्नईनं त्याला विकत घेतलं असून तो आता या आयपीएलमधून आपला फॉर्म परत आणतो का? हे पाहावे लागेल.
View this post on Instagram
सॅम करन इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
या लिलावात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला पंजाब किंग्जने तब्बल 18.50 कोटी रुपयांना सामील करून घेतले आहे. करनला दुखापतीमुळे लीगच्या मागील हंगामाला मुकावे लागले होते, मात्र या मोसमात तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. करनला विकत घेण्यासाठी त्याच्या दोन जुन्या संघ पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये चांगलीच लढत रंगली, ज्यामध्ये पंजाबने बाजी मारली. यासह करन हा या लीगमध्ये सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडूही ठरला आहे.
स्टोक्स आणि कॅमरॉननही तोडला रेकॉर्ड
याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. सॅमसह ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीन आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सनेही मॉरिसला मागे टाकलं आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)