नाणेफेक जिंका, फायनल जिंका... IPL फायनलचे 16 वर्षांचे आकडे काय सांगतात?
IPL Final toss winner list : आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा विजेता कोण हे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर ठरणार आहे.
IPL Final toss winner list : आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा विजेता कोण हे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर ठरणार आहे. एमए. चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये महाअंतिम सामना होणार आहे. आयपीएल फायनलसाठी नाणेफेक महत्वाची ठरणार आहे, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचे विजयाची शक्यता जास्त आहे. मागील 16 आयपीएल फायनलमध्ये नाणेफेक जिंकणारा संघाचे वर्चस्व राहिलेय.
नाणेफेक गमावणाऱ्या संघाच्या पदरी निराशाच -
आयपीएलचं हे 17 वं पर्व आहे. आतापर्यंत 16 आयपीएल फायनल झाल्या आहेत.आतापर्यंतच्या सर्व फायनलवर नजर टाकल्यास नाणेफेक गमावणाऱ्या संघाला फटका बसलाय. आतापर्यंत 12 वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने आयपीएल चषकावर नाव कोरलेय. तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाला फक्त चार वेळा चषकावर नाव कोरता आलेय. पाहूयात 16 वर्षांचा इतिहास काय सांगतो.
2008 - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - टॉस विजेता राजस्थान - सामना जिंकणारा संघ - राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
2009- डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - टॉस विजेता संघ आरसीबी - सामना जिंकणारा संघ - डेक्कन चार्जर्स
आरसीबीने नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतली
2010- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - टॉस विजेता संघ चेन्नई - सामना जिंकणारा संघ - चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
2011 - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - टॉस विजेता चेन्नई - सामना जिंकणारा संघ - चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
2012 - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - टॉस विजेता कोलकाता - सामना जिंकणारा संघ - कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली.
2013 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - टॉस विजेता मुंबई - सामना जिंकणारा संघ -मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
2014 - किंग्स 11 पंजाब विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स - टॉस विजेता कोलकाता - सामना कुणी जिंकला - कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाताने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला.
2015 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - टॉस विजेता मुंबई - सामना जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला.
2016 - सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु - टॉस विजेता सनराइजर्स - सामना जिंकणारा संघ सनराइजर्स हैदराबाद
सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली.
2017 - मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट - टॉस जिंकणारा संघ मुंबई - सामना जिंकणारा संघ - मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजी घेतली.
2018 - सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - टॉस जिंकणारा संघ चेन्नई - सामना जिंकणारा संघ - चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली.
2019 - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - टॉस जिंकणारा संघ मुंबई - सामना जिंकणारा संघ - मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून फलंदाजाचा निर्णय घेतला.
2020 - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - नाणेफेक जिंकणारा संघ दिल्ली - सामना जिंकणारा संघ - मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
2021 - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स - नाणेफेक जिंकणारा संघ कोलकाता - सामना जिंकणारा संघ - चेन्नई सुपर किंग्स
कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकून फील्डिंग घेतली.
2022 - राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टाइटन्स - टॉस विजेता संघ राजस्थान रॉयल्स - सामना जिंकणारा संघ - गुजरात टायटन्स
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
2023 - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स - टॉस विजेता संघ चेन्नई - सामना जिंकणारा संघ - चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली.