IPL Final 2025 Preity Zinta: IPLच्या अंतिम सामन्यात पराभव होताच पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटाला किती कोटींचे नुकसान?; आकडेवारी समोर
IPL Final 2025 Preity Zinta: आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर एकीकडे आरसीबीला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, तर प्रीती झिंटाला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

IPL Final 2025: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा (Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings) 6 धावांनी पराभव करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. 2008 पासून ते आजपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं आयपीएलमध्ये अफाट लोकप्रियता कमावलीये. मुंबई आणि चेन्नईसारखेच आरसीबी फ्रॅन्चायझीचेही कोट्यवधी चाहते आहेत. विराट कोहलीला तर या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. या चाहत्यांचं गेल्या 18 वर्षांपासून एकच स्वप्न होतं, आरसीबीनं आयपीएल ट्रॉफी जिंकावी आणि ती काल रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली.
Tears. Roars. Jubilation 🥹
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
The emotions of #RCB were raw, real, and 1⃣8⃣ years in the making ❤️#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets pic.twitter.com/fXVTbfCZFp
पंजाब किग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 190 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने नाबाद 61 धावांची खेळी केली. तर जोस इंग्लिशने 39 धावांची खेळी केली, पंजाब किंग्ज संघाला 184 धावा करता आल्या. हा संघ विजयापासून आणि आपल्या पहिल्या ट्रॉफीपासून 6 धावा दूर राहिला.
We gave it everything, but fell just short in the end. 💔#SherSquad, your love and support carried us through every high and low.
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) June 3, 2025
We hope our fight, our passion, and our cricket made you proud and brought a little joy to your hearts. ❤️
प्रीती झिंटाला किती कोटींचे नुकसान झाले?
पंजाब किंग्सचा पराभव झाल्यानंतर मालकीण प्रीती झिंटा खूप दुःखी झाली. एकीकडे आरसीबीला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, तर प्रीती झिंटाला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आयपीएलची फायनल जिंकणाऱ्या संघाला 20 कोटींची बक्षीस रक्कम मिळते. त्याचवेळी, उपविजेत्या संघाला 12.5 कोटी दिले जातात. 20 कोटी रुपये आरसीबीला देण्यात आले आहेत आणि प्रितीच्या संघाला फक्त 12.5 कोटी रुपये मिळाले आहेत. जर पंजाब किंग्सने जेतेपद जिंकले असते तर त्यांना 20 कोटी रुपये मिळाले असते. ज्यामुळे प्रिती झिंटाला करोडोंचा फायदा झाला असता. मात्र अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रीती झिंटाला करोडोंचे नुकसान झाले आहे.
आयपीएल 2025 च्या पुरस्कारांची संपूर्ण यादी
विजेता संघ - आरसीबी 20 कोटी
उपविजेता - पंजाब किंग्ज संघ 12.5 कोटी
तिसऱ्या स्थानी राहिलेला संघ- मुंबई इंडियन् 7 कोटी
चौथ्या स्थानी राहिलेला संघ – गुजरात टायटन्स 6 कोटी
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा 1 लाख
अंतिम फेरीतील सामनावीर - कृणाल पांड्या 5 लाख रुपये
उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स, 759 धावा) 10 लाख रुपये आणि पर्पल कॅप
फँटसी किंग ऑफ द सीझन - साई सुदर्शन 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर(एमव्हीपी) - सूर्यकुमार यादव 15 लाख रुपये आणि ट्रॉफी
फेअरप्ले पुरस्कार - चेन्नई सुपर किंग्ज 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्स ऑफ द सीझन - निकोलस पूरन (40 षटकार) 10 लाख
ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन - मोहम्मद सिराज 10 लाख
कॅच ऑफ द सीझन - कामिंदू मेंडिस 10 लाख
सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - 10 लाख
फोर ऑफ द सीझन साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) 10 लाख
खेळपट्टी आणि मैदान - दिल्ली कॅपिटल्स होम ग्राउंड 50 लाख





















