(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Auction 2024 Live : चेन्नईला हैदराबादने गुंडाळले, ट्रेविस हेडला 6.80 कोटींमध्ये घेतले
IPL Auction 2024 Live : ऑस्ट्रेलियाला विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ट्रेविस हेड याला हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात घेतले.
IPL Auction 2024 Live : ऑस्ट्रेलियाला विश्वचषक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ट्रेविस हेड याला हैदराबाद संघाने आपल्या ताफ्यात घेतले. ट्रेव्हिस हेड याच्यासाठी हैदाराबाद आणि चेन्नई संघामध्ये चूरस चांगलीच चूरस पाहायला मिळाली. काव्या मारन यांनी अखेर बाजी मारली. हैदराबाद संघाने ट्रेविस हेड याला 6 कोटी 80 लाख रुपयांत खरेदी केली. ट्रेविस हेड टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यासोबत फिरकी गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे हैदराबाद संघाने त्याच्यावर डाव खेळलाय.
ट्रेविस हेड याआधी सहा वर्षांपासून आयपीएलचा भाग राहिला होता. ट्रेविस हेड याने आतापर्यंत आयपीएलचे दहा सामने खेलले आहेत. त्याने दहा सामन्यात 205 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 138 इतका राहिलाय. त्याला फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय. त्याने आठ षटकार आणि 12 चौकार लगावले आहेत. ट्रेविस हेड 2016 ते 2017 या हंगामात आयपीएल खेळलाय.
विश्वचषकात हेडची शानदार कामगिरी -
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) या विश्वचषकात केवळ 6 सामने खेळले, परंतु त्या 6 सामन्यांमध्ये त्याने 54.83 च्या सरासरीने आणि 127.51 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 329 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आणि त्याची सर्वोत्तम खेळी म्हणजे 137 धावांची खेळी, जी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळली गेली. त्याचवेळी त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्धशतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. हेडने गोलंदाजीतही अनेकवेळा महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या, ज्याने संघाच्या विजयात भूमिका बजावली. हेडने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे की तो एक प्रभावशाली आणि मोठा सामना खेळाडू आहे. त्याच्यावर हैदराबाद संघाने डाव खेळलाय.
IPL Auction 2024 Live : हॅरी ब्रूक दिल्लीच्या ताफ्यात, चार कोटी केले खर्च
IPL Auction 2024 Live : हॅरी ब्रूकसाठी राजस्थान आणि दिल्ली संघामध्ये चूरस झाली. हॅरी ब्रूकची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. दिल्लीने चार कोटी रुपयांत हॅरी ब्रूकला खरेदी केले. इंग्लंडचा युवा हॅरी ब्रूक गेल्या हंगामात हैदराबादच्या संघाचा सदस्य होता. हॅरी ब्रूक याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. हॅरी ब्रूक याने 11 आयपीएल सामन्यात 190 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 100 इतकी राहिली आहे. त्याचा स्ट्राईक रेट 123 इतका आहे. त्याने चार षटकार आणि 23 चौकार लगावले आहेत.
IPL Auction 2024 Live : 7.40 कोटीमध्ये रॉवमन पॉवेल राजस्थानच्या ताफ्यात
IPL Auction 2024 Live : रॉवमन पॉवेल याची बेस प्राईज एक कोटी आहे. कोलकात्याने पहिल्यांदाच लावली बोली.त्यानंतर राजस्थान संघाने यामध्ये भाग घेतला. राजस्थान आणि कोलकातामध्ये पॉवेलसाठी चूरस झाली. अखेर यामध्ये राजस्थानचा विजय झाला. राजस्थानने 7 कोटी रुपयात रॉवमन पॉवेल याला आपल्या ताफ्यात घेतले.
वेस्ट इंडिजच्या रॉवमन पॉवेल याने आयपीएलच्या 15 डावात 257 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट 146 इतका आहे. त्याने 22 षटकार ठोकले आहेत. पॉवेल फिनिशरची भूमिका बजावू शकतो.
दिग्गज अनसोल्ड -
करुण नायर, स्टिव्ह स्मिथ, रुली रुसो आणि मनिष पांडे अनसोल्ड राहिले.