(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025: रोहित, विराटपासून धोनीपर्यंत...; फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, संभाव्य यादी आली समोर
IPL 2025: संघात अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येणार आहे
IPL 2025: बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मेगा लिलावाआधी नवीन नियम जाहीर केले आहेत. यामध्ये आयपीएलमधील (IPL) एक संघ जास्तीत जास्त 5 खेळाडूंना संघात कायम ठेवू शकतील. तर राईट टू मॅचचा (RTM) वापर करुन आणखी एक खेळाडू संघात ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
आयपीएलमधील (IPL 2025) एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आयपीएलमधील 10 संघ कोणत्या खेळाडूंना यंदाच्या हंगामासाठी संघात कायम ठेवणार, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान सर्व 10 संघाची संभाव्य खेळाडूंची यादी समोर आली आहे.
1. चेन्नई सुपर किंग्स (CSK)
चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने विक्रमी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईकडून यंदा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह रवींद्र जडेजा, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, मथिसा पाथिराना आणि महेंद्रसिंग धोनी यांना कायम ठेवेल असे मानले जात आहे.
2. मुंबई इंडियन्स (MI)
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्यासह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि अंशुल कंबोज यांना संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.
3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)
विराट कोहलीशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मोहम्मद सिराज, विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांना कायम ठेवू शकते. मात्र, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आरसीबी फक्त विराट कोहलीलाच संघात कायम ठेवेल.
4. राजस्थान रॉयल्स (RR)
संजू सॅमसनसह राजस्थान रॉयल्स जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा यांना संघात कायम ठेवू शकते.
5. कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, फिल सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा हे आयपीएल गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत असू शकतात.
6. गुजरात टायटन्स (GT)
गुजरात टायटन्स शुभमन गिल, राशिद खान, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, मोहम्मद शमी आणि राहुल तेवतिया यांना संघात कायम ठेवू शकतात.
7. लखनौ सुपर जायंट्स (LSG)
लखनऊ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुल व्यतिरिक्त क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई आणि मयंक यादव यांना संघात कायम ठेवू शकतात.
8. दिल्ली कॅपिटल्स (DC)
ऋषभ पंत व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स ट्रिस्टन स्टब्स, मिचेल मार्श, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अक्षर पटेल आणि अभिषेक पोरेल यांना संघात कायम ठेवू शकतात.
9. पंजाब किंग्स (PBKS)
सॅम कुरन व्यतिरिक्त पंजाब किंग्स अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांना संघात कायम ठेवू शकतात.
10. सनरायझर्स हैदराबाद (SRH)
सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, टी. नटराजन आणि नितीश कुमार रेड्डी यांना संघत कायम ठेवू शकतात.
संबंधित बातमी:
IPL मध्ये आता खेळाडूंची मनमानी चालणार नाही, अन्यथा थेट 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयने उचललं मोठं पाऊल