Venkatesh Iyer IPL Mega Auction 2025 : धडाकेबाज व्यंकटेश अय्यरसाठी शाहरुख खानने लावली सर्व ताकद... KKRने ओतला पाण्यासारखा पैसा
Venkatesh Iyer IPL Mega Auction 2025 : धडाकेबाज फलंदाजासाठी शाहरुख खानने लावली सर्व ताकद... KKRने ओतला पाण्यासारखा पैसा
IPL 2025 Mega Auction Venkatesh Iyer : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात संघांनी अनेक खेळाडूंसाठी बोली लावत आहे. व्यंकटेश अय्यरचे नाव अष्टपैलू गटात आले तेव्हा या खेळाडूला विकत घेण्यासाठी लढत होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने या अष्टपैलू खेळाडूला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले.
Follow all the live action from the #TATAIPLAuction here - https://t.co/8ofDm7OEiz
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 24, 2024
व्यंकटेश अय्यर आयपीएल 2024 पर्यंत कोलकाता संघाचा भाग होता. मात्र, फ्रँचायझीने लिलावापूर्वी या खेळाडूला सोडले होते. आता पुन्हा एकदा कोलकाताने व्यंकटेश अय्यरचा आपल्या संघात समावेश केला आहे. यावेळी केकेआरने व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटींना विकत घेतले आहे.
So many new memories to make together 💜 pic.twitter.com/56zTfjqbdv
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 24, 2024
असे अनेक खेळाडू होते ज्यांना अपेक्षेप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटी रुपयांना विकत घेतले. लखनऊने एडन मार्करामला त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये दिली. राहुल त्रिपाठीचीही फारशी विक्री झाली नाही. या स्टायलिश फलंदाजाला चेन्नई सुपर किंग्सने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले.
Excited to have you back with us, Venkatesh! 😁 pic.twitter.com/3CmYUiRUqw
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 24, 2024
5 खेळाडूंवर 100 कोटी खर्च
ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरला 26.75 कोटींना विकत घेतले. या लीगच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला 18 कोटींना विकत घेतले. पंजाबने अर्शदीपला आरटीएमखाली घेतले. लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही 18 कोटींना विकत घेतले. इंग्लंडच्या जोस बटलरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. त्याला 15.75 कोटी रुपये मिळाले. बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. या सर्व खेळाडूंची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक आहे.
IPL 2025 मेगा लिलावात आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू
- ऋषभ पंत - लखनऊ सुपर जायंट्स - 27 कोटी रुपये.
- श्रेयस अय्यर - पंजाब किंग्स - 26.75 कोटी रुपये.
- व्यंकटेश अय्यर- कोलकाता – 23.75 कोटी रुपये.
- अर्शदीप सिंग - पंजाब किंग्स - 18 कोटी रुपये.
- युझवेंद्र चहल – पंजाब किंग्स – 18 कोटी रुपये.
- जोस बटलर - गुजरात टायटन्स - 15.75 कोटी रुपये.