(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हार्दिक, दुबे शून्यावर बाद, रोहितही अपयशी ; T20 विश्वचषक संघात सामील होताच भारतीय दिग्गज फ्लॉप
IPL 2024 T-20 ICC World Cup 2024: खराब कामगिरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आधीच टीकेला सामोरे जात आहे.
IPL 2024 T-20 ICC World Cup 2024: आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी बीसीसीआयने भारतीय संघाची नुकतीच घोषणा केली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबेसह अनेक दिग्गजांना भारतीय संघात स्थान देण्यात आले. मात्र टी-20 चा संघ जाहीर होताच या खेळाडूंनी आयपीएलच्या सामन्यात खराब कामगिरी केल्याचे दिसून येते.
खराब कामगिरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आधीच टीकेला सामोरे जात आहे. आता या यादीत रोहित शर्मा आणि शिवम दुबेच्या नावाचाही समावेश झाला आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात, 3 खेळाडू खेळले ज्यांची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
पहिले नाव आहे शिवम दुबेचे, ज्याने IPL 2024 मध्ये 10 सामन्यात 350 धावा केल्या आहेत. चालू हंगामात तो 50 च्या सरासरीने धावा करत आहे, पण पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसरे नाव म्हणजे चेन्नईचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाचे, ज्याला 4 चेंडूत केवळ 2 धावा करता आल्या. या संपूर्ण मोसमात 159 धावा करण्याव्यतिरिक्त जडेजा केवळ 5 विकेट घेऊ शकला आहे. चेन्नई आणि पंजाबच्या सामन्यात खराब कामगिरी करणारा तिसरा खेळाडू अर्शदीप सिंग आहे, ज्याने 1 बळी घेतला परंतु 4 षटकात 52 धावा दिल्या.
मुंबईचे 3 खेळाडू फ्लॉप-
गेल्या मंगळवारी, आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना झाला. लखनौच्या एकाही खेळाडूला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, पण मुंबईच्या 4 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. कालच्या सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप ठरला, त्याला 5 चेंडूत केवळ 4 धावा करता आल्या. रोहितला शेवटच्या 3 डावात केवळ 18 धावा करता आल्या. दुसरीकडे, हार्दिक पांड्याने लखनौविरुद्ध 2 विकेट घेतल्या, पण फलंदाजी करताना तो शून्यावर बाद झाला. त्याच्याशिवाय, जगातील अव्वल टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादव कालच्या सामन्यात केवळ 10 धावा करून बाद झाला. विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर या खेळाडूंची फ्लॉप कामगिरी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू-
शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद