एक्स्प्लोर

IPL 2024 SRH vs RR: डॅनियल व्हेटोरीचा बाहेर बसून मास्टरस्ट्रोक; एका निर्णयाने सामना फिरवला, पॅट कमिन्सचा विजयानंतर खुलासा

IPL 2024 SRH vs RR: पॅट कमिन्सने विजयाचे श्रेय प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीला दिले. कठीण परिस्थिती असताना डॅनियल व्हेटोरीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण खेळ बदलला असं पॅट कमिन्सने सामन्यानंतर सांगितले.

IPL 2024 SRH vs RR: आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) राजस्थान रॉयल्सचा (RR) 36 धावांनी पराभव केला. या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधील प्रवास इथेच संपला. 

हैदराबादच्या विजयानंतर संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) विजयाचे श्रेय प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीला (Dan Vettori) दिले. कठीण परिस्थिती असताना डॅनियल व्हेटोरीच्या एका निर्णयामुळे संपूर्ण खेळ बदलला असं पॅट कमिन्सने सामन्यानंतर सांगितले. दरम्यान, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीआधी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदातान उतरलेल्या शाहबाज अहमदला गोलंदाजीची धुरा सोपवण्यात आली. पॅट कमिन्सच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र हा निर्णय हैदराबादसाठी चांगला ठरला. 

पॅट कमिन्स नेमकं काय म्हणाला? 

पॅट कमिन्स म्हणाला की, मयंक मार्कंडेच्या गोलंदाजीआधी शाहबाज अहमदला गोलंदाजी देण्याचा मास्टरस्ट्रोक डॅनियल व्हेटोरीचा होता. या निर्णयाने संपूर्ण सामना फिरला. शाहबाद अहमदने 4 षटकांत 23 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या. यामध्ये यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि रविचंद्रन अश्विनच्या विकेट्सचा समावेश होता. राजस्थानच्या संघात उजव्या हाताने फलंदाजी करणारे जास्त खेळाडू होता. याचकारणामुळे आम्ही डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूला गोलंदाजी दिली. 

राजस्थानचा डाव कसा होता?

176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त 10 धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी 16 चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही 11 चेंडूत फक्त 10 धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग 10 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने 160 च्या स्ट्राईक रेटने शेवटपर्यंत झुंज दिली. जुरेल याने 35 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली.

संबंधित बातमी:

IPL 2024 SRH VS RR: हैदराबादचा विजय होताच काव्या मारन नाचू लागली; धावत जाऊन त्याला पहिले मिठी मारली, पाहा Video

ICC T 20 World Cup 2024: आयपीएलच्या अंतिम सामन्यात भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील एकही खेळाडू खेळणार नाही; पाहा संपूर्ण यादी

IPL 2024 SRH VS RR  Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर तीन गोष्टींवर बोट ठेवलं...; संजू सॅमसमने कोणावर खापर फोडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget