एक्स्प्लोर

LSG : लखनौला मोठा धक्का,6.4 कोटी खर्च करुन संघात घेतलेला खेळाडू स्पर्धेबाहेर,आता कुणाला संधी देणार?

Lucknow Super Giants : सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवणाऱ्या लखनऊ सुपर जाएंटसला धक्का बसला आहे. 6.4 कोटी रुपये खर्च करुन संघात घेतलेला शिवम मावी दुखापतीमुळं संघाबाहेर गेला आहे.

लखनौ : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात दोन विजय आणि एका पराभवासह 4  गुणांच्या जोरावर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जाएंटसला (Lucknow Super Giants) धक्का बसला आहे. एकीकडे टीमला मयंक यादव (Mayank Yadav) सारखा वेगवान गोलंदाज फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे शिवम मावी (Shivam Mavi) दुखापतीमुळं आयपीएलच्या बाहेर गेला आहे. लखनौ सुपर जाएंटसच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये शिवम मावी नेमकी दुखापत कसली झाली आहे, हे न सांगता मी या स्पर्धेला मुकणार असल्याचं म्हणतो. 

शिवम मावी त्या व्हिडिओत म्हणतो की,  दुखापतीनंतर इथं आलो होतो, मला वाटलेलं की मी माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करेल. दुर्दैवानं मला दुखापतीमुळं स्पर्धा सोडावी लागत असल्याचं शिवमनं म्हटलं.  क्रिकेटरनं मानसिक रित्या देखील मजबूत असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दुखापतग्रस्त असता तेव्हा तुम्हाला पुनरागमन करायचं असतं, त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या कराव्यात असं त्यानं म्हटलं. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार बरगड्यांमधील वेदनांमुळं शिवम मावी आयपीएलला मुकणार आहे. 

शिवम मावीला लखनौ सुपर जाएंटसनं 6.4 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं होतं. लखनौ सुपर जाएंटसचा संघ आता तीन मॅचपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या तीन मॅचमध्ये शिवम मावीला संघात स्थान मिळालं नव्हतं. 

आमची टीम चांगली आहे, मी  आमच्या टीमला प्रोत्साहन देत राहणार असून आम्ही आयपीएल जिंकू असा विश्वास  शिवम मावीनं व्यक्त केला. लखनौ सुपर जाएंटसनं शिवम मावीच्या जागी कुणाला संधी देणार यासंदर्भात घोषणा केलेली नाही.  

लखनौ सुपर जाएंटसनं ट्विट करुन शिवम मावीला तू आणखी मजबूत होऊन कमबॅक करशील, या सर्व प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहे, असं लखनऊ सुपर जाएंटसनं म्हटलं आहे. 

लखनौ सुपर जाएंटसकडे शिवम मावी शिवाय मॅट हेन्री, शमार जोसेफ, मोहसिन खान, नवीन उल हक, मयंक यादव, यश ठाकूर, अर्शद खान, युधीर सिंग असे अनेक पर्याय वेगवान गोलंदाजीसाठी उपलब्ध आहेत. 

संबंधित बातम्या :

Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सला धक्का; आयपीएलमधील 'पर्पल कॅप'चा मानकरी अचनाक मायदेशी परतला

Mayank Yadav : मयंक यादवच्या बॉलिंगची धडकी, फलदाजांनी कसं खेळावं? ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतो...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget