Sameer Rizvi : समीर रिझवीच्या फटकेबाजीवर धोनी खूश, सिक्सर किंग म्हणाला, भैय्यानं बॅटिंगचा कानमंत्र...
Sameer Rizvi : समीर रिझवीनं महेंद्रसिंह धोनीनं गुजरात विरुद्ध बॅटिंगला जाण्यापूर्वी नेमका काय सल्ला दिला होता. यासंदर्भात माहिती दिली आहे. धोनीनं दबाव घेऊ नको, असं सांगितल्याचं रिझवी म्हणाला.
चेन्नई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024 ) चेन्नई सुपर किंग्जनं नवा सिक्सर किंग शोधला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) यूपीच्या सिक्सर किंगला संघात संधी दिली आहे. त्या सिक्सर किंग्जचं नाव समीर रिझवी (Sameer Rizvi) असं आहे. समीर रिझवीला चेन्नईनं आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्येच संघात संधी दिली होती. मात्र, त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली नव्हती. समीर रिझवीला काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमध्ये 19 व्या ओव्हरमध्ये संधी मिळाली. समीर रिझवीनं पहिल्याच बॉलवर राशिद खानला सिक्स मारला. समीर रिझवीची बॅटिंग पाहून महेंद्रसिंह धोनी देखील आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.
समीर रिझवी धोनी बाबत काय म्हणाला?
समीर रिझवी हा नेहमी 7 नंबरची जर्सी घालून क्रिकेट खेळतो. आयपीएलमध्ये मात्र महेंद्रसिंह धोनी 7 नंबरची जर्सी घालून खेळत असल्यानं समीर रिझवीला जर्सी नंबर बदलावा लागला. समीर रिझवीनं धोनी 7 नंबरची जर्सी वापरत असल्यानं 1 नंबरची जर्सी घातल्याचं म्हटलं. समीर रिझवीनं 6 बॉलमध्ये 2 सिक्स मारत 14 धावा केल्या. समीर रिझवीनं मारलेले सिक्स पाहून महेंद्रसिंह धोनी देखील खूश झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं.
महेंद्रसिंह धोनीसोबतचे अनुभव समीर रिझवीनं सांगितले आहेत. चेन्नई सुपर किंग्जनं मला संधी दिली त्यानं आनंद झाला होता, भैय्याला (धोनी) भेटणं हे स्वप्न होतं, आता त्याच्यासोबत क्रिकेट खेळत आहे. आम्ही आता सोबत खेळत आहोत, मी अनेकदा नेट प्रॅक्टीसमध्ये भैय्याला भेट असतो आणि सल्ले घेत असतो. धोनीकडून जितकं जास्त शिकता येईल तितकं शिकण्याचा प्रयत्न असतो, असं समीर रिझवी म्हणाला.
महेंद्रसिंह धोनी म्हणजेच भैय्यानं मला मी ज्या प्रकारे क्रिकेट खेळतो त्यात प्रकारे क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. आयपीएलमध्ये खेळताना आपल्याला स्पर्धेप्रमाणं दृष्टिकोन बदलावा लागेल,असं सांगितल्याचं समीर रिझवी म्हणाला. जेव्हा तू फलंदाजीला जाशील तेव्हा दबाव घेण्याची गरज नाही.पहिल्यांदा बॅटिंग करताना परिस्थितीचा अंदाज घेत कोणताही दबाव न घेऊ नको, असा सल्ला दिल्याचं समीर रिझवीनं म्हटलं.
समीर रिझवीनं यूपी लीगमध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत त्यानं 35 सिक्स मारले होते. समीर रिझवीची ओळख सिक्सर किंग अशी आहे. चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएलच्या लिलावात बोली लावत 8.4 कोटी रुपयांना समीर रिझवीला आपल्या टीममध्ये घेतलं होतं. आयपीएलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना समीर रिझवीनं पहिल्याच बॉलवर राशिद खान सारख्या बॉलरला सिक्स मारुन फलंदाजीची झलक दाखवली होती.
संबंधित बातम्या :
Shubman Gill : शुभमन गिलला दुसरा धक्का, चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर आणखी झटका, जाणून घ्या कारण