एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलला दुसरा धक्का, चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर आणखी झटका, जाणून घ्या कारण

Shubman Gill : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल झालेल्या मॅचमध्ये नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट टीमनं धक्का दिला आहे.

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात काल आयपीएलची (IPL 2024) सातवी मॅच पार पडली. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव झाला होता.चेन्नईच्या टीमनं होम ग्राऊंडवर सलग दुसरा विजय मिळवला. शुभमन गिलनं (Shubman Gill) टॉस जिंकून बॅटिंगसाठी चेन्नईला आमंत्रित केलं होतं. ऋतुराज गायकवाड आणि राचीन रवींद्र यांनी या संधीचा फायदा घेत चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली होती. चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 206 धावा केल्या होत्या. यावेळी स्लो ओव्हर रेटमुळं गुजरातचा कॅप्टन शुभमन गिलवर आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्ट कमिटीनं कारवाई केली आहे.  शुभमन गिलला  12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  

गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलला स्लो ओव्हर रेट प्रकरणात दोषी आढळल्यानं 12 लाखांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड एम.ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कालच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचसाठी आकारण्यात आला.  17 व्या आयपीएलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कॅप्टनला दंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

इंडियन प्रीमियर लीगच्या कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्याप्रकरणी शुभमन गिलला 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलनं याबाबत अधिकृत पत्रक जारी केलं आहे.     

हार्दिक पांड्यानं गुजरातची कॅप्टनसी सोडतं मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद स्वीकारलं आहे. यामुळं गुजरात टायटन्सच्या टीमचं नेतृत्व शुभमन गिलकडे देण्यात आलं होतं. शुभमन गिलनं गुजरातचं नेतृत्त्व करत पहिल्या मॅचमध्ये मुंबई विरुद्ध संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र, दुसऱ्या मॅचमध्ये गुजरातला पराभव स्वीकारावा लागला याशिवाय शुभमन गिलला आर्थिक दंड देखील करण्यात आला आहे.   

शुभमन गिलचा एक निर्णय चुकला अन्...

शुभमन गिलनं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाचा फायदा घेत चेन्नईनं 6 विकेटवर 206 धावा केल्या. चेन्नईकडून राचीन रवींद्र 46 , ऋतुराज गायकवाड 46 आणि शिवम दुबेनं 51 धावा केल्या. या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर चेन्नईनं 206 धावा केल्या. चेन्नईनं ठेवलेल्या आव्हानाचा सामना करताना गुजरातला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर  148 धावा करता आल्या आणि गुजरातचा 63 धावांनी पराभव झाला. गुजरात टायटन्सला शुभमन गिलच्या नेतृत्त्वात चेन्नईकडून गेल्या वर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. मात्र, चेन्नईनं होम ग्राऊंडवर आक्रमक खेळ करत गुजरातला मॅचमध्ये कमबॅक करुन दिलं नाही. चेन्नईनं गुजरातचा पराभव करत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. 

 Sameer Rizvi : समीर रिझवीचे राशिद खानला खणखणीत सिक्सर, थेट आंद्रे रस्सेलच्या पंक्तीत एंट्री, चेन्नईचे पैसे वसूल

Ajinkya Rahane: अजिंक्यनं हनुमान उडी मारत घेतला अफलातून कॅच, गुजरातच्या डेव्हिड मिलरचा कार्यक्रम,पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget