एक्स्प्लोर

IPL 2024, RR vs RCB : बटलरनं धोनीच्या स्टाइलनं सिक्स मारत मॅच संपवली, राजस्थानचा विजयाचा चौकार, विराटचं शतक व्यर्थ

RR vs RCB : राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिलेलं 183 धावांचं आव्हान पार केलं आहे. जोस बटलर आणि संजू सॅमसन यांच्या खेळीच्या जोरावर राजस्थाननं हा विजय मिळवला.

जयपूर :  राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) दिलेलं 183 धावांचं आव्हान यशस्वीपणे पार केलं आहे. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 विकेटच्या जोरावर 183 धावा केल्या होत्या. विराट कोहलीच्या नाबाद  113 धावा आणि कॅप्टन फाफ डु प्लेसिस याच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीनं राजस्थानपुढं 183 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर आणि कॅप्टन संजू सॅमसन यांच्या खेळीच्या जोरावर धावसंख्येचा पाठलाग केला. कॅप्टन संजू सॅमसननं 69 धावा केल्या. कॅप्टन बाद झाल्यानंतर जोस बटलरनं इतर खेळाडूंच्या साथीनं राजस्थानला विजयाजवळ नेलं. राजस्थान रॉयल्सनं जोस बटलरच्या 4 सिक्स आणि 9 चौकारांच्या जोरावर 58 बॉलमध्ये 100 धावा करत महेंद्रसिंह धोनी स्टाइलनं सिक्स मारुन राजस्थानला विजय मिळवून दिला.

रॉयल चॅलेंजर्स बगंळुरुनं दिलेलं 183 धावांचं आव्हान गाठताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल गोल्ड डकवर बाद झाला. यानंतर राजस्थानचा डाव कॅप्टन संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी सावरला. जोस बटलरनं धावा केल्या तर संजू सॅमसननं 69 धावा केल्या.  संजू सॅमसनची कर्णधारपदाला साजेशी खेळी, जोस बटलरला सूर गवसला 

राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर सलामीवीरांच्या कामगिरीचा प्रश्न होता. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या पूर्वीच्या  मॅचमध्ये चांगली कामगिरी करु शकले नव्हते. आज देखील यशस्वी जयस्वाल शुन्यावर बाद झाला. तर, महत्त्वाच्या मॅचमध्ये जोस बटलर फॉर्ममध्ये परतला. दुसरीकडे कॅप्टन संजू सॅमसननं कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 69 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं 42 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 चौकारांसह 69 धावाकेल्या. 

राजस्थान रॉयल्सनं आजची मॅच जिंकून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थाननं सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवत 8 गुणासंह पहिलं स्थान पटकावलं आहे. 

विराटचं शतक आरसीबीच्या  3 विकेटवर 183 धावा

राजस्थाननं प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर रॉयल चलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली आणि  फाफ डु प्लेसिसनं डावाची सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं यंदाच्या  आयपीएलमधील सलामीच्या भागिदारीचं रेकॉर्ड मोडलं. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं आरसीबीला 125 धावांची भागिदारी करुन दिली. फाफ डु प्लेसिस 44 धावा करुन बाद झाला. यानंतर आरसीबीचा डाव विराट कोहलीनं पुढं नेला. विराट कोहलीनं 72 बॉलमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 113 धावा केल्या. विराटच्या खेळीच्या आधारे आरसीबीनं 20 ओव्हर्समध्ये 3 विकेटवर 183 धावा केल्या. 

संबंधित बातम्या : 

Virat Kohli :आयपीएलसाठी स्पेशल लूक, विराट कोहली एका हेअर कटसाठी किती रुपये मोजतो? लाखो रुपये फी घेणारा हेअर स्टायलीस्ट म्हणतो..

IPL 2024 : यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद कोण मिळवणार? माजी क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
Embed widget