IPL 2024 RCB vs RR : विराट कोहलीनं शतक झळकावलं, संजू सॅमसनचं टेन्शन वाढवलं, आरसीबीचा राजस्थानसमोर 183 धावांचा डोंगर
RR vs RCB : आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना राजस्थानला वरचढ होऊ दिलं नाही. आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीनं शतकी भागिदारी केली.
जयपूर : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वातील 19 वी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात सुरु आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसनचा हा निर्णय राजस्थानसाठी फायदेशीर ठरला नाही. राजस्थान रॉयल्सच्या बॉलर्सला आरसीबीची सलामीवीर जोडी विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डु प्लेसिस यांना लवकर बाद करण्यात यश आलं नाही. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागिदारी केली. युजवेंद्र चहलनं बंगळुरुला पहिला धक्का दिला. विराट कोहलीनं चार सिक्स आणि 12 चौकाराच्या जोरावर 113 धावा केल्या. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर आरसीबीनं 3 बाद 183 धावा केल्या.
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं डाव सावरला
राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं शतकी भागिदारी केली. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी कॅच सोडल्यानं बंगळुरुचा फायदा झाला. राजस्थान रॉयल्सला पहिली विकेट फाफ डु प्लेसिसच्या रुपानं मिळाली. फाफ डु प्लेसिसनं 44 धावा केल्या. तर, ग्लेन मॅक्सवेल आज पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. ग्लेन मॅक्सवेल एका रनवर बाद झाला. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येची भागिदारी केली.
विराट कोहलीनं एका बाजूनं किल्ला लढवला
विराट कोहलीनं आरसीबीला आजच्या मॅचमध्ये चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीनं यापूर्वीच्या चार मॅचमध्ये 203 धावा केल्या होत्या. आजच्या मॅचमध्ये सुरुवातीपासून विराट कोहलीनं फटकेबाजी सुरु ठेवली होती. विराट कोहलीनं शुभमन गिलचा विक्रम मोडला आहे. आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक संख्येची नोंद शुभमन गिलच्या नावावर होती. शुभमन गिलनं 89 धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं 72 बॉलमध्ये नाबाद 113 धावा केल्या.
राजस्थानचं गचाळ क्षेत्ररक्षण
आजचा दिवस राजस्थानच्या खेळाडूंसाठी आव्हानात्मक होता.राजस्थानच्या अनेक खेळाडूंकडून गचाळ क्षेत्ररक्षण झाल्याचं पाहायला मिळालं. काही खेळाडूंनी कॅच देखील सोडल्याचं पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या :
RR vs RCB :आरसीबीला बॅटिंगला आमंत्रण, राजस्थान बॉलिंग करणार, संजू सॅमसनचा टॉस जिंकत मोठा निर्णय