IPL 2024: RCB ला मिळाले नवे हेड कोच; संजय बांगर, माइक हेसन यांचा करार संपला
RCB IPL 2024: आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि माइक हेसन कार्यमुक्त झाले असून दोघांचाही संघासोबतचा करार संपला आहे. आता संघानं नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
IPL 2024 Head Coach Sanjay Bangar RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) च्या पॉईंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) सहाव्या क्रमांकावर होता. संघानं यंदाच्या हंगामात 14 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीनं 2022 मध्ये टॉप 4 संघांमध्ये स्थान पटकावलं होतं. पण तरिदेखील आरसीबीचा संघ चॅम्पियन होऊ शकला नव्हता. आरसीबीच्या सातत्यानं होणाऱ्या पराभवाबाबत अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता याचसंदर्भात आरसीबीनं मोठं पाऊल उचललं आहे.
संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि माइक हेसन यांचा संघासोबतचा करार संपला आहे. त्यामुळे आरसीबीकडून आता नव्या हेड कोचची नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीनं नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती केली आहे.
Their professionalism and work ethics have always been held in high regard. A number of youngsters were given a platform to learn and succeed in the last four years. 👏#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/47IH78lR59
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 4, 2023
आरसीबीनं ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत संघानं माईक हेसन आणि संजय बांगर यांचे आभार मानले आहेत. हेसन हे क्रिकेट ऑपरेशन्सच्या संचालकपदावर होते. तर बांगर हे मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. आरसीबीनं ट्वीट केलं की, आम्ही माईक हेसन आणि संजय बांगर यांचे आभार मानतो. या दोघांची कामाची नीतिमत्ता नेहमीच प्रभावी राहिली आहे. गेल्या चार वर्षांत अनेक तरुणांना शिकण्याची संधी दिली. या दोघांचाही कार्यकाळ संपला आहे. माईक आणि संजय यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.
विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आतापर्यंत एकदाही आयपीएलचं जेतेपद पटकावलेलं नाही. 2020 मध्ये संघ चौथ्या क्रमांकावर होता. त्यावेळी संघानं 14 पैकी 7 सामने जिंकले आणि 7 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी आरसीबीनं एलिमिनेटरपर्यंतचा प्रवास केला होता. एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादनं 6 गडी राखून पराभव केला. यानंतर 2021 मध्ये एलिमिनेटरमध्येही पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स संघानं 4 विकेट्सनी पराभूत केलं. 2022 एलिमिनेटर सामना जिंकून संघानं दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला. पण तिथे आरसीबीला राजस्थान रॉयल्सनं 7 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर 2023 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीचा संघ फॉर्मात होता, पण तरीदेखील प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :