IPL 2024 MI vs SRH: मुंबईचा सामना पाहण्यासाठी पोहचला 'ज्यूनिअर बुमराह'; वानखेडेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
IPL 2024 MI vs SRH: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला.
IPL 2024 MI vs SRH: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबादचा (Sunrise Hyadrabad) 16 चेंडू शिल्लक असताना 7 विकेट्सने पराभव केला आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या 143 धावांच्या भागीदारीमुळे मुंबईला विजयाची नोंद करण्यात यश मिळाले.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. यावेळी जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) कुटुंब स्टँडवर बसलेले दिसले. जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganeshan) आणि मुलगा अंगद बुमराह देखील मुंबईता सामना पाहण्यासाठी पोहचला होता. अंगदच्या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
Angad with his mother Sanjana. 🥹❤️ pic.twitter.com/iOsDL00o38
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 6, 2024
काल संजनाचा होता वाढदिवस-
काल जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिचा वाढदिवस होता. संजनाचा जन्म 6 मे 1991 रोजी पुण्यात झाला. जसप्रीतनेही सोशल मीडियावर पोस्ट करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अंगदचा जन्म गेल्या वर्षी 4 सप्टेंबरला झाला
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च 2021 रोजी विवाहबद्ध झाले. सुमारे अडीच वर्षांनंतर त्यांना एका मुलाचे आई-वडील झाल्याचा आनंद मिळाला. अंगद बुमराहचा जन्म 4 सप्टेंबर 2023 रोजी झाला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी त्यांच्या मुलाच्या जन्माबद्दल सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, नवीन सदस्याच्या आगमनाने त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे.
मुंबईचा हैदराबादविरुद्ध विजय-
मुंबईचा संघ दबावाखाली असताना सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सूर्या आणि तिलक यांच्या भागीदारीच्या जोरावर मुंबईने 15 षटकांत 3 गडी गमावून 139 धावा केल्या होत्या. मुंबईला शेवटच्या 5 षटकात 35 धावा हव्या होत्या. पुढच्या 2 षटकात 28 धावा आल्या, पॅट कमिन्सच्या षटकात 18 धावा आल्या. येथून मुंबईचा विजय एकतर्फी ठरला कारण संघाला 18 चेंडूत फक्त 7 धावा हव्या होत्या. सूर्यकुमार यादवने 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचून 52 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि मुंबईचा 7 गडी राखून विजय निश्चित केला.
मुंबईचे आघाडीचे फलंदाज फ्लॉप-
174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 31 धावांमध्ये मुंबईने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. इशान किशन 9, रोहित शर्मा 4 आणि नमन धीर 0 स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर मात्र सूर्याचा शो सुरु झाला. सूर्यानं प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.
संबंधित बातम्या:
यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video