एक्स्प्लोर

IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni: '...तेव्हा संघासोबत जेवताना MS धोनी खूप रडला'; हरभजन सिंगने सांगितली आठवण

IPL 2024 Harbhajan Singh On MS Dhoni: काही दिवसांआधी आयपीएलचे समालोचन करताना हरभजन सिंगने याबाबत खुलासा केला होता.

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीने (CSK) 2 वर्षांच्या बंदीचा सामना केल्यानंतर 2018 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन केले. फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याने CSK वर बंदी घालण्यात आली होती. मात्र 2018 मध्ये आयपीएलमध्ये पुन्हा चेन्नईने पुनरागमन केले, तो काळ आठवून एमएस धोनी (MS Dhoni) खूप रडला होता, असं चेन्नईचा माजी खेळाडू हरभजन सिंगने सांगितले. 

काही दिवसांआधी आयपीएलचे समालोचन करताना हरभजन सिंगने याबाबत खुलासा केला होता. चेन्नईचा संघ 2 वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये परतला तेव्हा संघाने एकत्र जेवण केले होते. हरभजनने सांगितले की, पुरुष सहज रडत नाहीत ही म्हण मी ऐकली होती, पण त्या दिवशी धोनी खूप रडला होता. धोनी खूप भावूक झाला. समालोचनाच्या या पॅनलमध्ये हरभजनसोबत इम्रान ताहिरही उपस्थित होता. ताहिर 2018 मध्ये चेन्नईकडून खेळला होता. ताहिरने सांगितले की, त्या डिनरमध्ये तोही उपस्थित होता आणि त्याने धोनीला रडताना पाहिले होते. सीएसके धोनीच्या हृदयाच्या किती जवळ आहे हे ताहिरला त्या दिवशी कळले. धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला आपले कुटुंब मानतो, असं ताहिरने सांगितले. 

चेन्नईवर बंदी का घालण्यात आली?

जुलै 2015 मध्ये, आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. चेन्नईचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप होता. सुप्रीम कोर्टाने एक तपास समिती स्थापन केली होती, ज्याने या प्रकरणात मयप्पनसह राज कुंद्रा यांना दोषी ठरवले होते. या कारणामुळे आयपीएलच्या दोन्ही संघांवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

आयपीएलमध्ये परतताच जेतेपद पटकावले-

2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आयपीएलमध्ये पुन्हा प्रवेश स्फोटक होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नईने IPL 2018 मध्ये केवळ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले नाही तर अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नईने ट्रॉफीवर कब्जा करण्याची ही तिसरी वेळ होती.

संबंधित बातम्या:

यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video

टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन आल्याची माहिती, CWI ने सुरक्षेचे दिले आश्वासन

Preity Zinta Income From IPL: बॉलिवूडपासून दोन हात लांब असणारी प्रीती झिंटा आयपीएलमधून किती कमाई करते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget