LSG vs KKR : निकोलस पूरननं एकहाती डाव सावरला, केकेआरपुढं लखनौनं किती धावांचं आव्हान ठेवलं?
IPL 2024 : आयपीएलमध्ये आजच्या सुपर संडेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जाएंटस आमने सामने आले आहेत.

कोलकाता : आज आयपीएलमध्ये (IPL 2024) दोन लढती होणार आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन वर लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knigth Riders) यांच्यातील मॅच सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सची यंदाच्या आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिली आहे. आज त्यांनी टॉस जिंकून लखनौला पहिल्यांदा फलंदाजीला आमंत्रित केलं. कॅप्टन श्रेयस अय्यरचा निर्णय कोलकाच्या बॉलर्सनी योग्य ठरवला. एका बाजूनं लखनौचे फलंदाज बाद होत असताना निकोलस पूरननं डाव सावरला. के.एल. राहुल, आयुष बदोनी, निकोलस पूरनच्या खेळीच्या जोरावर लखनौनं 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 161 धावा केल्या.
कोलकाताच्या बॉलर्सचे नियमित पण लखनौला धक्के
लखनौच्या डावाची सुरुवात क्विंटन डी कॉक आणि के.एल. राहुल या दोघांनी केली होती. मात्र, क्विंटन डी कॉक 10 धावांवर असताना त्याला वैभव अरोरानं बाद केलं. यानंतर दीपक हुडा देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. हुडाला मिशेल स्टार्कनं 8 धावांवर असातना बाद केलं. यानंतर के.एल. राहुल देखील 39 धावा करुन बाद झाला. आयुष बदोनीनं देखील 29 धावा केल्या. तर,मार्कस स्टॉयनिस 10 धावा करुन बाद झाला. निकोलस पूरननं 45 धावा केल्या. यामध्ये त्यानं चार षटकार आणि दोन चौकार मारले.
निकोलस पूरननं लखनौचा डाव सावरला. लखनौच्या धावसंख्येला अखेरच्या टप्प्यात वेग देण्याचं काम निकोलस पूरननं केलं. त्यानं एकूण सिक्स मारले. होम ग्राऊंडवर टॉस जिंकून श्रेयस अय्यरनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलताच्या बॉलर्सनी लखनौच्या फलंदाजांचा जम बसून दिला नाही. मिशेल स्टार्क, वैभव अरोरा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांनी लखनौला अधिक धावा काढू दिल्या नाहीत. लखनौच्या नियमित अंतरानं विकेट गेल्यानं त्यांना अपेक्षेप्रमाणं धावसंख्या उभारता आली नाही.
कोलकाता विजयाच्या मार्गावर परतणार?
कोलकातानं पहिल्या चार मॅचमध्ये विजय मिळवला होता. मात्र, कोलकाताला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रॉयडर्सची टीम सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवण्याची जबाबदारी आता कोलकाताच्या फलंदाजांवर असेल.
लखनौची मदार आता बॉलर्सवर
दुसरीकडे केएल. राहुलच्या नेतृत्त्वातील लखनौ सुपर जाएंटसनं आतापर्यंत पाच मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यांना दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौ सुपर जाएंटस तीन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मयंक यादव आणि मोहसिन खान दोघेही जखमी असल्यानं आजच्या मॅचमध्ये देखील ते उपलब्ध नसल्याचा फटका बसेल.
संबंधित बातम्या :





















