एक्स्प्लोर

Virat Kohli And Gautam Gambhir: कोहली अन् गंभीर आज पुन्हा आमने-सामने; पण यंदा भलतंच घडलं, चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का, Video

Virat Kohli And Gautam Gambhir News Marathi: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात गेल्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये जोरदार वाद झाला होता.

RCB vs KKR Virat Kohli And Gautam Gambhir News Marathi: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात गेल्या हंगामात म्हणजेच IPL 2023 मध्ये जोरदार वाद झाला होता. 2023 मध्ये गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर होता, पण या सीझनमध्ये (IPL 2024) गंभीर केकेआरची मेंटरची जबाबदारी सांभाळत आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला जात आहे. त्यामुळे कोहली आणि गंभीरच्या वादामुळे केकेआर आणि आरसीबीच्या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. मात्र आज मैदानात वेगळचं घडल्याचं पाहायला मिळालं.

कोहली आणि गंभीरमध्ये वादविवाद होण्याची चाहत्यांना अपेक्षा असतानाच दोघांमध्ये आज मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले. टाइम आऊट दरम्यान गंभीर मैदानावर आला आणि येताच त्याने सर्वप्रथम कोहलीची भेट घेतली आणि त्याला मिठी मारली. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गंभीर येतो आणि सर्वप्रथम तो कोहलीशी हस्तांदोलन करतो आणि नंतर त्याला मिठी मारतो. यादरम्यान दोघांमध्ये काही संवाद होतो आणि दोन्ही दिग्गजांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक चाहते आश्चर्यचकित झाले.

कोहलीने स्टार्कला धुतलं-

विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या. आयपीएल 2024 मधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कची विराट कोहलीने चांगलीच धुलाई केली. विराट कोहली आणि मिचेल स्टार्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आमनेसामने आले. स्टार्कच्या पहिल्या षटकांतील पहिल्याच चेंडूत चौकार मारत डावाची सुरुवात केली. त्यानंतर संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या स्टार्कला विराट कोहलीने एक खणखणीत षटकार आणि दोन चौकार लगावले.

कोलकाता नाइट रायडर्सला विजयासाठी 183 धावांचं आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज आयपीएलचा सामना होत आहे. केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीने फलंदाजी करताना 182 धावा केल्या. कोलकाताला सामना जिंकण्यासाठी 183 धावांचं लक्ष्य दिलं आहे. आरसीबीकडून फलंदाजी करताना संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस 8 धावा करत बाद झाला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणेने त्याला झेलबाद केले. त्यानंतर कॅमरॉन ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत 33 धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात ग्रीनला अपयश आले. ग्ले मॅक्सवेल आणि विराट कोहलीने संघाला सावरले. नारायणने मॅक्सवेलला 28 धावांवर झेलबाद केले. आज पुन्हा रजत पाटीदार मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला.  विराट कोहलीने संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने अखेरच्या क्षणी येऊन संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. कार्तिकने 8 चेंडूत 20 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!

 IPL 2024: हरणाऱ्या मॅचेस जिंकल्या, गोलंदाजांना धू धू धुतलं, IPL च्या पहिल्या आठवड्यात सापडले तीन हिरे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Embed widget