MI Captaincy: रोहित शर्माला काढून मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधार का केले?
MI Captaincy: हार्दिक पांड्या गुजरातच्या ताफ्यातुन मुंबईत आला तेव्हाच त्याला कर्णधारपद मिळणार, अशी अटकळ बांधली जात होती. यावर आता अधिकृत मोहोर उमटवली.
MI Captaincy: हार्दिक पांड्या गुजरातच्या ताफ्यातुन मुंबईत आला तेव्हाच त्याला कर्णधारपद मिळणार, अशी अटकळ बांधली जात होती. यावर आता अधिकृत मोहोर उमटवली. मुंबई इंडियन्सने आज हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. मुंबई इंडियन्ससाठी हा निर्णय कदाचित सोपा नसेल, पण गेल्या तीन हंगामात विजेतेपद न मिळवलेल्या संघात बदल करण्यासाठी काहीतरी नवीन करावे लागले. पण हार्दिक पांड्याला नेतृत्व मिळण्याचे कारण काय ? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात सुरुच आहे.
हार्दिकची निवड का केली ?
हार्दिक पांड्याने गुजरातची धुरा संभाळताच पदार्पणातच चॅम्पियन केले, इतकेच नाही तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात संघाने सातत्याने शानदार कामगिरी केली. त्याशिवाय टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी टीम इंडियाचे नेतृत्वही हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. त्याने लागोपाठ भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. अशा स्थितीत रोहित शर्माच्या जागी मुंबईला हार्दिक पांड्या शानदार रिप्लेसमेंट वाटली.
हार्दिक पांड्या आयपीएल 2022 पासून शानदार लयीत आहे. त्याने मागील दोन हंगामात गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार प्रदर्शन केलेय. दीड वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरही वनडे आणि टी 20 मध्ये हार्दिकने प्रभावी कामगिरी केली आहे. शानदार प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाची धुराही यशस्वी संभाळळी, त्यामुळेच संघाचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्यावर डाव खेळलाय.
रोहितची खराब कामगिरी -
मागील तीन वर्षांपासून रोहित शर्मा लयीत दिसत नाही. कर्णधारपद आणि फलंदाजीतही रोहितला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 2020 मध्ये मुंबईने अखेरचा चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर तीन वर्ष मुंबईला शानदार कामगिरी करता आली नाही. दोन हंगामात तर मुंबईला क्वालिफायही करता आले नाही. यादरम्यान रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. रोहित फ्लॉप जात असताना दुसरीकडे हार्दिक पांड्याने सर्वांनाच प्रभावीत केले होते. त्यामुळेच मुंबईने हार्दिकला नेतृत्व देण्याचा विचार केला असेल.
हार्दिक पांड्याचं आयपीएल करियर -
हार्दिक पांड्याने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर तो गुजरातच्या ताफ्यात गेला. गुजरातला त्याने पदार्पणातच चषक जिंकून दिला. त्याशिवाय गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत उपविजेता ठरला होता. मुंबईसाठी हार्दिक पांड्या सहा वर्ष खेळलाय. त्यानंतर त्याने गुजरातची वाट धरली होती. आता तो मुंबईच्या ताफ्यात परतलाय. त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा संभाळली.
आणखी वाचा :
5 वेळा IPL चषक जिंकला, तरीही मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?