एक्स्प्लोर

IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादच्या हातून मॅच कधी निसटली, केकेआरच्या विजयाचा टर्निंग पॉईंट नेमका कोणता? पाहा व्हिडीओ

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला आठ विकेटनं पराभूत करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. केकेआरनं आयपीएलच्या इतिहासातील तिसरं विजेतेपद पटकावलं. 

IPL Final KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या सतराव्या पर्वाचं विजेतेपद मिळवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) आठ विकेटनं पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 113 धावांवर बाद केलं. यानंतर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि रहमानुल्लाह गुरबाझनं दमदार फलंदाजी करत केकेआरचा विजय सोपा केला. 

चेन्नईमधील एम. चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummis) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कोलकाताचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कनं (Mitchell Starc) आयपीएल गाजवणाऱ्या अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) 2 धावांवर बाद केलं. मिशेल स्टार्कनं टाकलेला बॉल यंदाच्या आयपीएल मधील अप्रतिम बॉल ठरला. यानंतर सनरायजर्स हैदराबादच्या डावाला जी गळती लागली ती थांबली नाही. मिशेल स्टार्कनं केकेआरसाठी दमदार कामगिरी केली.  सनरायजर्स हैदराबादच्या पराभवाचा हाच टर्निंग पॉईंट ठरला. 

पाहा व्हिडीओ :

हैदराबादचा दुसरा सलामीवीर ट्रेविस हेड ज्यानं देखील यंदाचं आयपीएल आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गाजवलं होतं.तो देखील आज शुन्यावर बाद झाला. वैभव अरोरानं ट्रेविस हेडला शुन्यावर बाद केलं. ट्रेविस हेड क्वालिफायर -1 मध्ये देखील शुन्यावर बाद झाला होता. आज देखील तो शुन्यावर बाद झाला. केकेआरसाठी सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीरांच्या विकेट लवकर मिळणं फायदेशीर ठरलं. 

केकेआरनं अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडला सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये बाद केलं. यावेळी मॅच केकेआरच्या हातात गेली ती सनरायजर्स हैदराबादच्या हाती आलीच नाही. मिशेल स्टार्कनं क्वालिफायर -1 आणि एलिमिनेटर गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला देखील बाद केलं. यानंतर आंद्रे रसेलनं देखील 3 विकेट घेत  सनरायजर्स हैदराबादला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पॅट कमिन्सनं अखेरच्या टप्प्यात किल्ला लढवल्यानं हैदराबादनं शंभर धावांचा टप्पा पार केला.  आंद्रे रसेलनं 3, मिशेल स्टार्कनं 2, हर्षित राणानं 2, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन आणि वैभव अरोरानं प्रत्येकी एक विकेट घेत हैदराबादला 113 धावांवर रोखलं. 

व्यंकटेश अय्यर आणि रहमानुल्लाहनं गुरबाझनं विजयाचा कळस चढवला

कोलकाताचा सलामीवीर सुनील नरेन आज चांगली कामगिरी करु शकला नाही. पॅट कमिन्सनं त्याला बाद केलं. व्यंकटेश अय्यर आणि रहमानुल्लाह गुरबाझनं आक्रमक फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना मॅचवर पकड मिळवू दिली नाही. व्यंकटेश अय्यरनं अर्धशतक करत केकेआरला विजय मिळवून दिला. रहमानुल्लाह गुरबाझला शाहबाझ अहमदनं बाद केलं.  केकेआर आयपीएल ट्रॉफी विजयाचं गिफ्ट सुनील नरेनला वाढदिवसाच्या निमित्तानं दिलं. बा

संबंधित बातम्या :

कोरबो-लोरबो जीतबो... कोलकात्यानं तिसऱ्यांदा चषकावर कोरलं नाव, IPL 2024 फायनलमध्ये हैदराबादचा 8 विकेटने पराभव

श्रेयस अय्यरला टीम इंडियातून वगळलं, T20 world cup मध्ये स्थान नाही, आता KKR ला एकतर्फी IPL चषक जिंकून दिला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहनCity 60 Super Fast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines  17 June 2024Mallikarjun Kharge On Wayanad Lok Sabha : राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार- खर्गे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
Photos : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनस्थळी मुंडे बहिण-भाऊ
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे समजावून सांगा; लक्ष्मण हाकेंची भेट पंकजांचा सरकारला सवाल
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोन हरवला तर लगेच PhonePe आणि Google Pay खातं ब्लॉक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!  वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीत निर्धार
लोकसभेतील पराभवानं खचून न जाता विधानसभेला ताकदीनं लढणार, वंचितचा निर्धार
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
Embed widget