एक्स्प्लोर

श्रेयस अय्यरला टीम इंडियातून वगळलं, T20 world cup मध्ये स्थान नाही, आता KKR ला एकतर्फी IPL चषक जिंकून दिला

Shreyas Iyer IPL : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 वर कोरले आहे. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेटने दारुण पराभव केला.

Shreyas Iyer IPL : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 वर कोरले आहे. चेन्नईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेटने दारुण पराभव केला. श्रेयस अय्यर याचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. अय्यरसाठी हा विजय खूप महत्वाचा आहे, कारण त्याला टीम इंडियात परत येण्यासाठी फायदा होईल. कोलकात्यानं आयपीएल 2024 मध्ये एकतर्फी वर्चस्व गाजवलं, यामध्ये कॅप्टन अय्यरचा सिंहाचा वाटा होता. पण अय्यरसाठी हे सोपं नव्हतं, कारण 2023 विश्वचषकात शानदार खेळल्यानंतरही त्याचा टीम इंडियातून पत्ता कट झाला होता. 

भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात श्रेयस अय्यरने खोऱ्याने धावा जमवल्या होत्या. विश्वचषकाची सुरुवात खराब झाली, पण फायनलपर्यंत धावांच डोंगर उभारला होता. भारताकडून सर्वाधिक धावा कऱणाऱ्या खेळाडूमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर झालेल्या इंग्लंडविरोधातील मालिकेत तो फ्लॉप गेला. त्यात त्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. बीसीसीआयकडून त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला. पाटदुखीमुळे त्यानं रणजी स्पर्धेत खेळणं टाळलं. पण त्यादरम्यान त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अय्यर याला बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. रणजी चषकात तो पाठदुखी असतानाही खेळला, त्यानंतर त्यानं आराम करत आयपीएलमध्ये शानदार कमबॅक केले. 

आयपीएल फायनलपूर्वी झालेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यानं आपल्याला झालेल्या दुखापतीबाबत सांगितले. मला पाठदुखी झाली होती, असं तो म्हणाला. टीम इंडियातून वगळण्यात आलं. करारातून वगळले, तरीही अय्यर मानसिकदृष्टी सक्षम राहिला. त्यानं आयपीएलच्या मैदानात शानदार कमबॅक केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकात्यानं चषकावर ना कोरले. गौतम गंभीर आणि चंदू पंडीत यांच्या इतकेच कोलकात्याच्या विजयात अय्यरचे योगदान आहे. 

यंदाच्या हंगामात अय्यरची कामगिरी - 

श्रेयस अय्यर याने 14 सामन्यात 351 धावा चोपल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 58 इतकी राहिली.त्याने 146.86 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. अय्यरने दोन अर्धशतके ठोकली. त्याने 34 चौकार आणि 14षटकार लगावले. अय्यर 5 वेळा नाबाद राहिलाय. 

कोलकात्यानं चषकावर कोरलं नाव - 

कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या सतराव्या मोसमाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या इतिहासात कोलकात्याचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. कोलकात्यानं याआधी २०१२ आणि २०१४ साली आयपीएल जिंकण्याची कामगिरी बजावली होती. त्यानंतर यंदा पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलची किंग ठरली आहे. कोलकात्यानं चेन्नईतल्या आयपीएल फायनलनवर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव ११३ धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल ५७ चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद ५२ धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं ३९ धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं १९ धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 17 June 2024Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024Tryambakeshwar Mandir Devotees beat : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन रांगेत भाविकांना मारहाण झाल्याचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Embed widget