IPL 2024 GT vs RCB: विराटचं अर्धशतक, विल जॅक्सचं शतक, आरसीबीचा गुजरातवर दणदणीत विजय
IPL 2024 GT vs RCB: गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल.
LIVE
Background
IPL 2024 Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru: आज गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार दुपारी 3.30 वाजत या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे.
आरसीबीनं विजयाचा गुलाल उधळला, गुजरातला पराभवाचा धक्का
आरसीबीनं विराट कोहली आणि विल जॅक्सच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 9 विकेटनं विजय मिळवला आहे.
विराट कोहली आणि विल जॅक्सची 100 धावांची भागिदारी
आरसीबीचे फलंदाज विराट कोहली आणि विल जॅक्स यांनी शतकी भागिदारी केली. तर, विल जॅक्सनं अर्धशतक केलं.
RCB vs GT : आरसीबीला पहिला धक्का, फाफ डु प्लेसिस 24 धावांवर बाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिला धक्का बसला आहे. फाफ डु प्लेसिस 24 धावा करुन बाद झाला आहे.
साई सुदर्शन, शाहरुख खानची खेळी गेमचेंजर, 20 ओव्हरमध्ये 200 धावा
गुजरात टायटन्सनं साई सुदर्शन आणि शाहरुख खानच्या अर्धशतकांच्या जोरावर 200 धावांचा टप्पा पार केला आहे.
गुजरात टायटन्सचा 150 धावांचा टप्पा पार
गुजरात टायटन्सनं 150 धावांचा टप्पा पार केला आहे. साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातनं सतराव्या ओव्हरमध्ये 150 धावांचा टप्पा पार केला.