GT vs PBKS : पंजाबची अखेरच्या ओव्हरपर्यंत लढत, गुजरात टायटन्सवर विजयासाठी संघर्षाची वेळ, राहुल तेवतिया ठरला मॅच फिनिशर
GT vs PBKS : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 37 वी मॅच पार पडली. या मॅचवर गुजरातचं वर्चस्व राहिलं.
मुल्लानपूर : आयपीएलमध्ये 37 व्या मॅचमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने सामने आले होते. आयपीएलमधील (IPL 2024) इतर सामन्यांच्या तुलनेत पंजाबला आजच्या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 142 धावा केल्या. पंजाबनं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातनं 7 विकेट गमावून हे आव्हान पार केलं. राहुल तेवतियाची खेळी गुजरातसाठी गेमचेंजर ठरली. गुजरातनं पंजाबवरील विजयासह आयपीएलमधील चौथा विजय मिळवला. पंजाब किंग्जचा होम ग्राऊंडवर चौथा पराभव झाला. पंजाब किंग्जला पाच पैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवता आला.
गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलनं 35, साई सुदर्शननं 31 आणि राहुल तेवातियानं 31ृ6 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर आजच्या मॅचमध्ये गुजरातनं कमबॅक केलं. गुजरातचे रिद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, ओमरजई, शाहरुख खान हे चांगली धावसंख्या करु शकले नाहीत. राहुल तेवतियानं योग्यवेळी धावा करत संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सनं आजच्या विजयासह 8 पैकी चार सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत 8 गुणांसह सहाव्या स्थानावर झेप घेतली. तर, पंजाब गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 8 मॅच खेळल्या असून त्यांनी दोन मॅचमध्ये विजय मिळवला असून सहा मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
पंजाब किंग्जच्या फलंदाजांना सूर गवसलाच नाही
गुजरात टायटन्सच्या भेदक माऱ्यापुढं पंजाब किंग्जच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. कॅप्टन सॅम करन 20 धावा करुन बाद झाला. सलामीवीर प्रभुसिमरन सिंगनं 3 सिक्स आणि 3 फोरच्या जोरावर 35 धावा केल्या. प्रभूसिमरन सिंगच्या 35 धावा पंजाबच्या डावात सर्वाधिक ठरल्या. राइली रुसो 9 तर जितेश शर्मा 13 धावा करुन बाद झाला.
लियाम लिव्हिंग्स्टोननं 6 धावा केल्या. शशांक सिंह आणि आशुतोष शर्माची जोडी आज अयशस्वी ठरली. शशांक सिंहनं 8 र आशुतोष शर्मानं 3 धावा केल्या. हरप्रीत भाटियानं 14 धावा केल्या. हरप्रीत ब्रारनं 29 धावा केल्या. हर्षल पटेल शुन्यावर बाद झाला तर कगिसो रबाडानं 1 रन केली.
गुजरातच्या बॉलर्सनी पंजाब किंग्जच्या फलंदाजांना सेट होऊ दिलं नाही. गुजरात टायटन्सच्या रवीश्रीनिवासन साई किशोरनं पंजाबच्या चार विकेट घेतल्या. तर, नूर अहमदनं 2, मोहित शर्मानं 2 आणि राशिद खाननं एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या :
Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!