एक्स्प्लोर

IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?

IPL 2024 Jake Fraser-McGurk: 22 वर्षीय मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 247 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 237.5 आहे.

IPL 2024 Delhi Capitals Jake Fraser-McGurk: ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने आपल्या झंझावाती खेळीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. IPL 2024 मध्ये त्याने दोनदा 15 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. मॅकगर्क चालू हंगामात सर्वात जलद अर्धशतक झळकवणारा खेळाडूही ठरला आहे. मॅकगर्कला  दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. पण त्याने अवघ्या 27 चेंडूत 84 धावांची खेळी करून बरीच चर्चा केली. 22 वर्षीय मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये 247 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 237.5 आहे.

मॅकगर्कने 29 चेंडूत शतक झळकावले आहे-

जेस फ्रेझर मॅकगर्कने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमध्ये 29 चेंडूत शतक झळकावले आहे. यासह तो क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याच्या आधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने आयपीएलमध्ये 30 चेंडूत शतक झळकावले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्सने 31 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी मॅकगर्कला मागे सोडले आहे, ज्याने 2023 मध्ये झालेल्या मार्श कप स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना तस्मानियाविरुद्ध केवळ 29 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 125 धावा केल्या होत्या.

माकडामुळे मॅकगर्क वर्ल्ड कप खेळू शकला नाही-

जेस फ्रेझर मॅकगर्क 2020 अंडर-19 क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियाकडून खेळणार होता. मात्र विश्वचषक सुरू होण्यापूर्वी त्याला माकडाने चावा घेतला, त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ बाद फेरीतून बाहेर पडला होता. दरम्यान मॅकगर्कचे नशीब आयपीएल 2024 मध्ये चमकत आहे, ज्यामुळे त्याला 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत वरिष्ठ ऑस्ट्रेलियन संघात खेळण्याची संधी मिळू शकते.

जेक फ्रेझर मॅकगर्क कोण आहे? (Who is Jake Fraser-McGurk?)

जेक फ्रेझर हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे, ज्याचा जन्म 11 एप्रिल 2002 रोजी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाला. मॅकगर्कने कॅरी बॅप्टिस्ट ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तो त्याच्या आक्रमक आणि तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. मॅकगर्कने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 16 सामने खेळताना 550 धावा केल्या आहेत. त्याच्या लिस्ट-1 कारकिर्दीत त्याने 21 सामन्यांत 525 धावा केल्या आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या या तुफानी फलंदाजाने 41 टी-20 सामने खेळून 808 धावा केल्या आहेत. त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी पदार्पण केले, जिथे तो वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना दिसला. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या 2 वनडे सामन्यांमध्ये त्याने 221.73 च्या स्ट्राईक रेटने 51 धावा केल्या आहेत.

दिल्लीने 20 लाखात खरेदी केलं-

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वीच, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापतीमुळे मोसमातून बाहेर होता. एनगिडीच्या जागी दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कला आपल्या संघात सामील केले होते. दिल्लीने त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच 20 लाखात मॅकगर्कचा समावेश केला आहे. मॅकगर्क अगदी कमी पैशात दिल्ली कॅपिटल्ससाठी कोट्यावधींची कामे करत आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

संबंधित बातम्या:

बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?

Shashank Singh: पंजाबने संधी दिल्यापासून धू धू धुतोय...; प्रतिस्पर्धी संघांना जोरदार नडतोय, कोण आहे शशांक सिंह?

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget