21 धावांवरच माघारी परतला असता...ऋषभ पंतची एक चूक अन् नारायणने पुढे 64 धावा ठोकल्या!
DC vs KKR: सुनील नरेनने 39 बॉलमध्ये 85 धावा केल्या. सुनील नरेननं 7 चौकार आणि 7 षटकार लगावत केकेआरला मजबूत स्थितीत आणून ठेवलं.
DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात काल विशाखापट्टणम येथे सामना खेळला गेला. केकेआरने प्रथम खेळताना 272 धावा केल्या. काल झालेल्या सामन्यांत सुनील नरेनने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले होते. तसेच डावाच्या शेवटी स्फोटक फलंदाजी करत आंद्रे रसेल दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली.
सुनील नरेनने 39 बॉलमध्ये 85 धावा केल्या. सुनील नरेननं 7 चौकार आणि 7 षटकार लगावत केकेआरला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. सुनील नरेन बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे परत जात असताना शाहरुख खान, गौतम गंभीरसह कोलकाताच्या इतर खेळाडूंनी टाळ्या वाजवून त्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं.
...तर नरेन 21 धावांवरच माघारी परतला असता-
दिल्लीकडून इशांत शर्माने चौथे षटक टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूत नरेनने षटकार लगावला. तर दुसऱ्या चेंडूत षटकार आणि तिसऱ्या चेंडूत चौकार लोटावला. इशांतच्या चौथ्या चेंडूवर नरेनने पुन्हा जोरदार चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात नरेनने अपयश आले. याच चेंडूवर नरेनची बॅट लागत चेंडू ऋषभ पंतकडे गेला होता. यावेळी मिचेल मार्शने अपील केले. मात्र त्याच्याव्यतिरिक्त कोणीही अपील केले नाही. मिचेल मार्शने पंतला डीआरएस घेण्याची विनंती केली. परंतु त्यानेही सुरुवातील रस दाखवला नाही. इशांतनेही डीआरएसची मागणी केली नाही. यावेळी नरेन 21 धावांवर फलंदाजी करत होता. मात्र मिचेल मार्श पुन्हा बोलल्यानंतर पंतने अंपायला आवाज देत डीआरसची मागणी केली. मात्र अंपायरने वेळ गेल्याचं सांगत डीआरएसची मागणी फेटाळली. काही चेंडू झाल्यानंतर मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर नरेनच्या बॅटीला चेंडू लागून गेल्याचे दिसले. यानंतर अंपायरवर पंत नाराज असल्याचे दिसून आले. पुढे नरेनने स्फोटक फलंदाजी करत 64 धावा ठोकल्या.
— Debi Cha (@ChaDebi95756) April 3, 2024
पंत काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर ऋषभ पंतला डीआरएसबद्दल विचारण्यात आले. यावर मैदानात खूप आवाज होता आणि स्क्रीनवर टायमरही दिसत नव्हता, कदाचित स्क्रीनमध्येही काही समस्या होती. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात आणि काही नसतात, असं पंतने सांगितले.
केकेआरचा आयपीएलमधील सलग तिसरा विजय
कोलकाता नाईट रायडर्सनं ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर केकेआरनं दुसऱ्या मॅचमध्ये आरसीबीचा पराभव केला होता. आज फलदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर केकेआरच्या बॉलर्सनी दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळू दिला नाही.
संबंधित बातम्या-
18 वर्षांच्या अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीला अस्मान दाखवलं; आई-वडिलांनी केलंय भारताचं प्रतिनिधित्व
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos