एक्स्प्लोर

Kohli-Gambhir Clash : गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीनं सोडलं मौन, म्हणाला...

Virat Kohli Gautam Gambhir Fined : लखनौ विरुद्ध बंगळुरु (LSG vs RCB) सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनं या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

RCB vs LSG, Virat Kohli Gautam Gambhir Fight : आयपीएल 2023 मधील 44 वा सामन्यात लखनौ आणि बंगळुरु (LSG vs RCB) या दोन संघात लढत पाहायला मिळाली. या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. सामन्यानंतर झालेल्या गंभीर सोबतच्या वादावर विराट कोहलीनं आता मौन सोडलं आहे. विराट कोहलीनं त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यान, या भांडणाचं कारण समोर आलेलं नाही. 

Virat Kohli Gautam Gambhir Clash : गंभीरसोबतच्या वादानंतर कोहलीनं सोडलं मौन

विराट कोहलीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत या प्रकरणावर मौन सोडलं आहे. कोहलीने रोमन राजा मार्कस ऑरेलियसचा संदेश (Quote) असलेला फोटो शेअर केला आहे. यामध्ये लिहलं आहे, 'आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही.' (Everything we hear is an opinion, not a fact. Everything we see is a perspective, not the truth.)

RCB vs LSG, Kohli-Gambhir Clash : कोहली आणि गंभीर यांच्या शाब्दिक चकमक

लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) पार पडला. या सामन्यात बंगळुरुनं 18 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. लखनौचा फलंदाज अमित मिश्रा, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनौचे सहाय्यक प्रशिक्षक विजय दहिया यांनी हा वाद सोडवला. यानंतर कोहली लखनौचा कर्णधार केएल राहुलशी बोलतानाही दिसला. दरम्यान, हे भांडण कोणत्या कारणावरून सुरु झालं यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

RCB vs LSG, IPL 2023 : कोहली, गंभीरसह नवीनला कोट्यवधींचा दंड

लखनौच्या इकाना स्टेडिअमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव केला. लखनौचा (LSG) त्यांच्याच घरच्या मैदानावर बंगळुरुकडून (RCB) 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. दरम्यान, सामन्यानंतर (LSG vs RCB Match) विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक (Lucknow Super Giants Mentor) गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात वाद झाला.

कोहली आणि गंभीर यांच्यातील वादाचं कारण काय?

या दोन्ही संघांमध्ये बंगळुरुच्या मैदानावर झालेल्या मागील सामन्यासोबत हा वाद जोडला जात आहे. आयपीएल 2023 मधील 15 व्या सामन्यात बंगळुरुला घरच्या लखनौ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेली गौतम गंभीरसह लखनौ संघानं जोरदार जल्लोष साजरा केला. यानंतर आरसीबीने पराभवाचा बदला घेत लखनौवरील विजयाचा जल्लोष साजरा केला. यावरूनच यावादाल तोंड फुटल्याचं बोललं जात आहे. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, वादाचं नेमकं कारण अद्याप समजलें नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kohli-Gambhir Clash Fine : भरमैदानात विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले, तिघांना कोट्यवधीचा दंड; नक्की प्रकरण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget