एक्स्प्लोर

हिशोब चुकता.... आरसीबीने लखनौचा 18 धावांनी केला पराभव

IPL 2023, LSG vs RCB: आरसीबीने लखनौचा १८ धावांनी पराभव केला. १२७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा डाव 108 धावांत संपुष्टात आला.

IPL 2023, LSG vs RCB: आरसीबीने लखनौचा १८ धावांनी पराभव केला. १२७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा डाव 108 धावांत संपुष्टात आला. आरसीबीने लखनौला नमवत परभवाचा वचपा काढला. लखनौने बेंगलोरमध्ये आरसीबीचा अखेरच्या चेंडूवर पराभव केला होता. आज आरसीबीने लखनौचा पराभव करत हिशोब चुकता केला. 

१२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. काइल मेयर्स याला मोहम्मद सिराज याने शून्यावर तंबूत धाडले. त्यानंतर हेजलवूड याने आयुष बडोनी याला चार धावांवर तंबूत धाडले. आरसीबीच्या गोलंदाजांनी पावरप्लेमध्येच लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत धाडले. लखनौचे आघाडीचे चार फलंदाज पावरप्लेमध्ये बाद झाले होते. मेयर्स आणि बडोनी बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या आणि दीपक हुड्डाही पावरप्लेमध्ये बाद झाले होते. दीपक हुड्डा एका धावेवर बाद झाला. तर कृणाल पांड्याने ११ चेंडूत १४ धावांचे योगदान दिले. पावरप्लेमध्ये लखनौच्या संघाने चार विकेटच्या मोबदल्यात फक्त ३४ धावा केल्या हत्या. 

आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि स्टॉयनिस यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात निकोलस पूरन ९ धावांवर बाद झाला. स्टॉयनिसह १३ धावांवर तंबूत परतला. स्टॉयनिस याने १३ धावांचे योगदान दिले. कृष्णाप्पा गौतम याने लखनौकडून सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले. गौतम याने दोन षठकार आणि एक चौकार लगावला. रवि बिश्नोई पाच धावांवर बाद झाला. अमित मिश्रा आणि नवीन उल हक यांनी अखेरच्या षटकात भागिदारी केल्यामुळे लखनौचा संघ १०० धावसंख्या ओलांडू शकला. अमित मिश्रा याने १९ धावांचे योगदान दिले. तर नवीन उल हक याने १३ धावा चोपल्या. लखनौच्या एकाही फलंदाजाला तीस धावसंख्येचा टप्पा ओलांडता आला नाही.

आरसीबीकडून कर्ण शर्मा आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वानंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. लखनौचे दोन फलंदाज धावबाद झाले. 

लखनौच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. इकानाच्या खेळपट्टीवर लखनौच्या गोलंदाजीसमोर आरसीबीने निर्धारित २० षटकात नऊ विकेटच्या मोबदल्यात १२६ धावांपर्यंत मजल मारली. सलामी भागिदारी वगळता आरसीबीच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करता आली नाही.  

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने संयमी सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर देत आरसीबीची धावसंख्या वाढवली. इकाना स्टेडिअमची खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाज पहिल्या षटकापासूनच गोलंदाजीसाठी उतरले होते. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस याने नऊ षटकात ६२ धावांची सलामी दिली. विराट कोहली याने ३० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर फाफ आणि अनुज रावत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रावत नऊ धावांर बाद झाला. रावत याने ११ चेंडूंत नऊ धावांची खेळी केली.

ग्लेन मॅक्सवेल याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मॅक्सवेल याला बिश्नोई याने तंबूत पाठवले. मॅक्सवेल याने चार धावांचे योगदान दिे. सुयेश प्रभुदेसाई स्वस्तात माघारी परतला. अमित मिश्रा याने प्रभुदेसाई याला तंबूचा रस्ता दाखवला. एका बाजूला विकेट पडत असताना फाफ याने दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी केली. फाफ डु पलेसिस याने ४० चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. फाफ याने आपल्या खेलीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. महिपाल लोमरोर याला तीन धावांवर नवीन उल हक याने बाद केले. दिनेश कार्तिक लयीत दिसत होता.. पण धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक याने विकेट फेकली. यश ठाकूर याने कार्तिकला धावबाद केले. कार्तिक बाद झाल्यामुळे आरसीबीच्या धावसंख्येला खीळ बसली. कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज दोघांना नवीन उल हक याने एकापाठोपाठ एक बाद केले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. हसरंगा याने नाबाद आठ धावांची खेळी केली. हेजलवूड एक धावांवर नाबाद राहिला. 

इकानाच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा दबदबा दिसला.  लखनौने चार फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी दिली होती. कृणाल पांड्या याने डावाचे पहिलेच षटक फेकले होते. कृणाल पांड्या याने चार षटकात फक्त २१ धावा दिल्या. रवि बिश्नोई याने चार षटकात २१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अमित मिश्रा याने तीन षटकात २१ धावा खर्च खरत दोन विकेट घेतल्या. तर कृष्णाप्पा गौतम याने दोन षटकात फक्त दहा धावा खर्च केल्या. गौतम याने एक विकेट घेतली. नवीन उल हक याने भेदक मारा केला. नवीन याने चार षटकात ३० धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget