एक्स्प्लोर

IPL 2023 Points Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल; दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, तर...

CSK vs KKR: कोलकातानं कालच्या सामन्यात चेन्नईचा 6 गडी राखून पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता KKR 12 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

CSK vs KKR, IPL 2023 Points Table: आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 61 वा लीग सामना संपल्यानंतर, आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफसाठी आपलं स्थान निश्चित करता आलेलं नाही. कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) नं चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध 6 गडी राखून विजय मिळवला आणि प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःचं स्थान कायम ठेवलं आहे. केकेआरचा संघ आता गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 13 लीग सामन्यांनंतर, कोलकाताचे आता 6 विजयांसह 12 गुण आहेत आणि संघाचा नेट रनरेट -0.256 आहे. 

गुजरात, चेन्नई, मुंबई आणि लखनौ आता टॉप 4 मध्ये

पॉईंट टेबलमध्ये (Points Table 2023) टॉप 4 मध्ये सध्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans), चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आहेत. गुजरात टायटन्स आतापर्यंत 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातचा सध्याचा नेट रनरेट 0.761 आहे. चेन्नई सुपर किंग्स 13 सामन्यांत 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यांचा नेट रनरेट 0.381 आहे.

मुंबई इंडियन्स सध्या 12 सामन्यांतून 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रनरेट सध्या -0.117 आहे. लखनौ सुपर जायंट्स संघ 13 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे आणि त्यांचा नेट रनरेट 0.309 आहे.

आरसीबी पाचव्या स्थानी, तर पंजाब आठव्या स्थानी

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध 112 धावांनी मोठ्या विजयासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आता पॉईंट टेबलमध्ये थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. आरसीबीचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत, नेट रनरेट 0.166 आहे. राजस्थान रॉयल्स आता सहाव्या स्थानावर पोहोचलं असून त्यांचा नेट रनरेट 0.140 आहे. 

पंजाब आठव्या, हैदराबाद नवव्या स्थानी, तर दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर 

चेन्नई विरुद्ध कोलकाताच्या सामन्यात कोलकाताच्या विजयानंतर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आता 12 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर घसरला आहे. पंजाबचा नेट रनरेट सध्या -0.268 आहे. नवव्या स्थानी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) संघ आहे, ज्यानं आतापर्यंत 11 सामन्यांनंतर 4 विजय मिळवले आहेत. हैदराबादचा नेट रनरेट -0.471 आहे. या सीझनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आहे, ज्याला 12 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले असून पॉईंट टेबलमध्ये  8 गुणांसह सर्वात शेवटी आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 : दिनेश कार्तिकने केली रोहित शर्माची बरोबरी, नकोसा विक्रम केला नावावर

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget