IPL 2023 : दिनेश कार्तिकने केली रोहित शर्माची बरोबरी, नकोसा विक्रम केला नावावर
Most ducks in IPL history : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक याची बॅट शांत असल्याचे दिसतेय.
![IPL 2023 : दिनेश कार्तिकने केली रोहित शर्माची बरोबरी, नकोसा विक्रम केला नावावर ipl 2023 dinesh karthik equals the record of most ipl ducks with rohit sharma rr vs rcb IPL 2023 : दिनेश कार्तिकने केली रोहित शर्माची बरोबरी, नकोसा विक्रम केला नावावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/14/d9f0dc66397e8eaa90b318660961757b1684080724996469_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Most ducks in IPL history : आयपीएलच्या सोळाव्या हंगमात आरसीबीचा फिनिशर दिनेश कार्तिक याची बॅट शांत असल्याचे दिसतेय. आतापर्यंत दिनेश कार्तिक याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गेल्या हंगमात आरसीबीसाठी कार्तिकने फिनिशरचे काम बजावले होते. पण यंदा कार्तिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. आजही आरसीबीसाठी करो या मरोच्या सामन्यात दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. दिनेश कार्तिक राजस्थानविरोधात गोल्डन डकचा शिकार झाला. यासह दिनेश कार्तिक याने रोहित शर्माच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. दोघेघी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. आतापर्यंत १६ वेळा शून्यावर बाद होण्याचा कारनामा दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी केलाय.
'या' यादीत इतर खेळाडूंचाही समावेश
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मनदीप शर्मा, सुनील नारायण हे खेळाडू शून्यावर प्रत्येकी 15-15 वेळा बाद झाले आहेत. यामध्ये आता दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांचं नाव पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक तब्बल १६ वेळा शून्यावर बाद झालेत. याशिवाय अंबाती रायडूही आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
यंदा कार्तिकची खराब कामगिरी -
यंदा दिनेश कार्तिकला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. सोळाव्या हंगामात दिनेश कार्तिक तीनवेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. दिनेश कार्तिकने १२ डावात फक्त १४० धावा केल्या आहेत. सर्वोच्च धासंख्या ३० आहे. कार्तिकची सरासरी फक्त १२ आहे तर स्ट्राईक रेट १३५ इतका आहे.
गेल्या हंगामात कार्तिकची धमाकेदार कामगिरी -
गेल्या आयपीएल हंगामात कार्तिकने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने फिनिशिंगचा रोल व्यवस्थित पार पाडला होता. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर कार्तिकचे टीम इंडियात पुनरागमन झाले होते. कार्तिकने गेल्या हंगामात 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावांचा पाऊस पाडला होता. यावेळी नाबाद 66 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. पण यंदाच्या हंगमात कार्तिक अद्याप फ्लॉप झालाय. त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
आतापर्यंतचे कार्तिकची आयपीएल कामगिरी -
दिनेश कार्तिक याने आतापर्यंत आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कार्तिकने 233 आयपीएल सामने खेळले आहेत. यामधील 212 डावात कार्तिकने 26.42 च्या सरासरीने आणि 132.43 च्या स्ट्राइक रेटने 4386 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 97 इतकी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)