IPL 2023 : गजविजेत्या गुजरातचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित, हैदराबादचं आव्हानही जिवंत; पाहा कोणत्या संघाला किती संधी?
IPL 2023 Play Off Team : आयपीएलमध्ये गतविजेत्या गुजरातचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चिच झाला आहे. तर हैदराबादसह इत संघानांही संधी आहे. समीकरण कसं आहे पाहा.
IPL 2023 Team Position : सनरायझर्स हैदराबादने रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अब्दुल समदने राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी दिसून येत आहे. दरम्यान सर्व संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी-जास्त आहे.
टॉप 4 मध्ये कोणते संघ?
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचे 8 गुण झाले आहेत. मात्र, सनरायझर्स हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स संघ लखनौचा पराभव करुन गुणतालिकेत पहिलं स्थान कायम राखून आहे. गुजरात संघ सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये पाय रोखून आहे. गुजरात, चेन्नई, लखनौ राजस्थान हे संघ सध्या जरी टॉप 4 मध्ये असले, तरी त्यांच्यासह इतर सर्व संघांना जास्तीत जास्त आगामी सामने जिंकणं आणि नेट रनरेट सुधारणं गरजेच आहे.
कोणत्या संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची किती शक्यता आहे, या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
IPL 2023 Playoffs Chances : प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी
- गुजरात (GT) - 99.5 टक्के
- चेन्नई (CSK) - 82 टक्के
- लखनौ (LSG) - 45 टक्के
- बंगळुरु (RCB) - 42 टक्के
- मुंबई (MI) - 41 टक्के
- पंजाब (PBKS) - 39 टक्के
- राजस्थान (RR) - 25 टक्के
- कोलकाता (KKR) - 14 टक्के
- हैदराबाद (SRH) - 12 टक्के
- दिल्ली (DC) - 11 टक्के
पाहा कोणत्या संघाला किती संधी?
IPL 2023 Playoffs chances:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2023
GT - 99.5%.
CSK - 82%.
LSG - 45%.
RCB - 42%.
MI - 41%.
PBKS - 39%.
RR - 25%.
KKR - 14%.
SRH - 12%.
DC - 11%.
सर्व संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. यासाठी त्यांना आगामी सामने जिंकण्याची आणि नशिबाचीही साथ आवश्यक आहे.
IPL 2023 Points Table - each and every team in the race of Playoffs. pic.twitter.com/6xSoKoj8vO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2023
हैदराबाद संघाचं आव्हानही जिवंत
या मोसमात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाने 10 सामने खेळले आहेत. या 10 सामन्यांमध्ये एडन मार्करामच्या संघाने 4 विजय मिळवले आहेत, तर 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादचे 8 गुण झाले आहेत. आता सनरायझर्स हैदराबादचे चार सामने बाकी आहेत. सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे चार सामने जिंकले तर 16 गुण होतील. टॉप-4 संघांवर नजर टाकली तर गुजरात टायटन्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबादने आपले शेवटचे चार सामने जिंकले तर 16 गुण होतील, पण असे असले तरी प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी एडन मार्करामच्या संघाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे शेवटचे चार सामने जिंकण्याबरोबरच या संघाला नशिबाचीही साथ मिळणं गरजेचं आहे.