IPL 2023 : बोल्टपुढे हैदराबादच्या नवाबांची शरणागती, पाहा भन्नाट गोलंदाजीचा व्हिडीओ
Trent Boult Bowling Viral : राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली.
Trent Boult Bowling Viral : राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याने भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडू दिले नाही. बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे दोन्ही फलंदाजांनी नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना बोल्टचा चेंडू समजलाच नाही.
ट्रेंट बोल्ट याचा चेंडू अभिषेक शर्मा याला समजला नाही. अभिषेक शर्मा त्रिफाळाचीत बाद झाला. तर राहुल त्रिपाठीलाही बोल्टचा चेंडू समजला नाही. बोल्टचा चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन गेला... स्लीपमध्ये उभा असलेलेल्या जेसन होल्डर याने हवेत झेपवत अप्रतिम झेल घेतला. बोल्टने पहिल्याच षटक निर्धाव फेकत हैदराबादच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. ट्रेंट बोल्ट याने पावरप्लेमध्ये तीन षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाक दोन विकेट घेतल्या. बोल्टने तीन षटकात अवघ्या आठ धावा गेत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. बोल्टच्या गोलंदाजीमुळे राजस्थानच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत. 204 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. बोल्टची गोलंदाजीपुढे हैदराबादच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. बोल्टच्या भेदक माऱ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पाहा बोल्टचा भेदक मारा ....
𝗧𝗵𝘂𝗻𝗱𝗲𝗿 𝗕𝗼𝘂𝗹𝘁! ⚡️⚡️
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
𝐖 0 𝐖 😉
A shaky start to #SRH's chase as they lose Abhishek Sharma & Rahul Tripathi in the first over of the chase!
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/NwtSFWZbwX
𝗧𝗵𝘂𝗻𝗱𝗲𝗿 𝗕𝗼𝘂𝗹𝘁! ⚡️⚡️
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
𝐖 0 𝐖 😉
A shaky start to #SRH's chase as they lose Abhishek Sharma & Rahul Tripathi in the first over of the chase!
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#TATAIPL | #SRHvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/NwtSFWZbwX
जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हैदराबादला विजयासाठी 204 धावांची गरज आहे.
आणखी वाचा :
पहिला सामना देवाला की मुंबई इंडियन्स परंपरा मोडणार? 2013 पासून IPL ची पराभवाने सुरुवात
Jos Buttler : जिथे सोडले तिथूनच सुरुवात, जोस बटलरने 20 चेंडूत झळकावले अर्धशतक