(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs SRH Pitch Report : हैदराबादच्या घरच्या मैदानावर लखनौची कसोटी, खेळपट्टीबाबत सर्वकाही वाचा सविस्तर...
IPL 2023 Pitch Report: सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाने त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांचा उर्वरित हंगाम केएल राहुलशिवाय खेळायचा आहे.
LSG vs SRH IPL 2023 : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामातील हा 58 वा सामना शनिवारी, 13 मे रोजी हैदराबाद येथे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात येईल.
सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाने त्यांच्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला त्यांचा उर्वरित हंगाम केएल राहुलशिवाय खेळायचा आहे. आता संघाची धुरा कृणाल पांड्याच्या खांद्यावर आहे. मागील सामन्यात संघाला गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला.
लखनौ संघाचा हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून टॉप 4 मध्ये म्हणजे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण हैदराबाद संघाची मागच्या काही सामन्यांमधील कामगिरी पाहता लखनौ संघासाठी हे एक आव्हान असेल. लखनौ संघाला मागील तीन सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, त्याउलट हैदराबाद संघाने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत.
The tug of #SRHvLSG war 🔥
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 12, 2023
Watch it live tomorrow from 3PM 🕒💥 pic.twitter.com/lmY5zX6c8z
Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफक जिंकणार संघ शक्यतो फलंदाजी करण्यचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोन्ही गोलंदाजांसाठी पुरेशी मदतशीर ठरते.
कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग 11?
LSG Probable Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, आयुष बडोनी, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंह, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.
SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद
अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
SRH vs LSG Match Preview : लखनौ विरुद्ध हैदराबाद, प्लेऑफमध्ये कुणाला संधी? हेड टू हेड आकडेवारी पाहा