RR vs DC : दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय, मिचेल मार्श संघाबाहेर, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IPL 2023, Match 11, RR vs DC : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आज लढत होणार आहे. दिल्ली पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे.
IPL 2023, Match 11, RR vs DC : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्ली संघ पहिल्या विजासाठी प्रयत्नशील असेल. आयपीएलच्या 16 व्या हंगामात दिल्लीला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. गुवाहाटीच्या मैदानात आज राजस्थान आणि दिल्ली यांच्यातील लढत रंगतदार होणार आहे.
डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या संघात महत्वाचे तीन बदल करण्यात आले आहे. मिचेल मार्श, अमन खान आणि सरफराज खान संघाबाहेर आहेत. त्यांच्याजागी रोवमन पॉवेल, मनिष पांडे आणि ललित यादव यांना स्थान देण्यात आले आहे. राजस्थानच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहे. जोस बटलर पूर्णपणे तंदुरुस्त असून आजच्या सामन्यात तो खेळणार आहे. देवदत्त पडिक्कल आणि केएम आसिफ यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी ध्रुव जुरैल आणि संदीप शर्मा यांना संघात स्थान दिलेय.
दिल्ली संघात तीन बदल -
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, राइली रुसो, रोवमन पॉवेल, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, ऑनरिख नॉर्खिया, मुकेश कुमार
राजस्थानचे 11 रॉयल कोण आहेत?
जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रवि अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील तिसरा सामना आहे. दिल्ली (DC) संघाला प्रतिस्पर्धी राजस्थान (RR) चा पराभव कडून खातं उघडण्याची संधी आहे. राजस्थान संघाला घरच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममधील परिस्थितीची चांगली सवय झाली आहे. असं असलं तरी, पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धचा त्यांचा मागच्या सामन्यात झालेला पराभव लक्षात घेता दिल्ली विरुद्ध विजय मिळवून त्यांना स्पर्धेत पुन्हा स्थान मिळवता येईल.
Barsapara Stadium Pitch Report : बरसापारा स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
बरसापारा स्टेडिअमची (Barsapara Stadium) खेळपट्टी (Pitch Report) मोठी धावसंख्या करणारी आहे. हे मैदान फलंदाजांसाठी फायदेशीर ठरतं. यावर सहज धावा होतात. फलंदाजाकडे ताकद आणि टायमिंग दोन्ही असेल आणि संयम असेल मोठे फटके मारता येतात. नाणेफेक हा देखील सामन्याचा महत्त्वाचा भाग असेल कारण अनेक संघांना प्रथम गोलंदाजी करायची आहे कारण, दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यास मदत होते.