एक्स्प्लोर

राशिद खानचा जयपूरमध्ये हल्लाबोल, राजस्थानचा डाव 118 धावांत आटोपला

IPL 2023, RR vs GT: गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

IPL 2023, RR vs GT: राशिद खान आणि नूर अहमद यांच्या गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फंलदाजांची दमछाक उडाली. राजस्थानला 20 षटके फलंदाजीही करता आली नाही. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 17.5 षटकात 118 धावांत संपुष्टात आला. गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी पाच विकेट घेतल्या, त्यामुळेच राजस्थानचा डाव 118 धावांवर संपुष्टात आला. गुजरातला विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. आक्रमक जोस बटलर अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. तर मागील सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल धावबाद झाला. यशस्वीने 11 चेंडूत 14 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन याने 20 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. संजू सॅमसन याने राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. गुजरातच्या गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फंलदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. संजू सॅमसन याच्यानंतर देवदत्त पडिक्कल यानेही विकेट फेकली. पडिक्कल याने १२ धावांचे योगदान दिले. आर अश्विन याला दोन धावांवर राशिद खान याने तंबूत पाठवले. तर रियान पराग याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले.. पण पराग इम्पॅक्ट पाडण्यात अपयशी ठरला. राशिद कान याने रियान पराग याला चार धावांवर तंबूत धाडले. 

लागोपाठ विकेट पडल्यामुळे राजस्थानचा डाव अडचणीत सापडला होता.  शिमोरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी राजस्थानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राशिद खान याने शिमरोन हेटमायर याला सात धावांवर बाद केले तर ध्रुव जुरेल याला 9 धावांवर नूर अहमद याने तंबूत पाठवले. 100 धावांच्या आत राजस्थानचे आठ फलंदाज तंबूत परतले होते. राजस्थानचा संघ सन्मानजनक धावसंख्या उभारणार का? असा प्रश्न पडला होता. पण ट्रेंट बोल्ट याने निर्णायाक फलंदाजी करत राजस्थानची धावसंख्या 110 च्या पुढे नेहली. ट्रेंट बोल्ट याने 11 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. संजू सॅमसन याच्यानंतर सर्वाधिक धावा ट्रेंट बोल्ट याने केल्या आहेत.  अॅडम झम्पा याने सात धावांची खेळी केली. तर संदीप शर्मा दोन दावांवर नाबाद राहिला.

गुजरातची भेदक गोलंदाजी - 

गुजरातच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच भेदक मारा केला. शमी, हार्दिक पांड्या आणि लिटल यांनी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळली. राशिद खान आणि नूर अहमद यांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना तंबूत धाडले. नूर अहमद आणि राशिद खान यांनी राजस्थानच्या मध्यक्रम तंबूत धाडला. दोघांनी पाच फलंदाजांना बाद केले. राशिद कान याने चार षटकात अवघ्या 14 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर नूर अहमदन याने तीन षटकात दोन फलंदाजांना बाद केले.   आर. अश्विन, रियान पराग आणि शिमरोन हेटमायर यांना राशिद खान याने तंबूत पाठवले. तर नूर अहमद याने ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना बाद केले. हार्दिक पांड्या, जोश लिटिल आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  राजस्थानचे दोन फलंदाज धावबाद झाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
×
Embed widget