एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...

Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली.

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कमालीचे नाराज झाले आहेत.  यानंतर छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा देखील झाली. यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, आज मी आणि समीर भुजबळ दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर चर्चा झाली. मागील काही दिवसात काय-काय घडलं? आता काय सुरू आहे, याबाबत आमचे बोलणे झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले की, यंदा आपल्याला महाविजय मिळालेला आहे. महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले आहे. ओबीसींनी यंदा महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबाबत आपण सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही याची काळजी मला देखील आहे. ओबीसींचे कदापि नुकसान मी होऊ देणार नाही. पण आता राज्यात जे काही सुरू आहे त्यामुळे मला आठ ते दहा दिवस तुम्ही द्या. आठ, दहा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यातून काढू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का?

नवीन वर्षात ओबीसींना मोठं गिफ्ट मिळणार का? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, ओबीसींचे नुकसान मी अजिबात होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी आपल्याला दूर करावीच लागेल, असे त्यांनी म्हटले. तर राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? असे विचारले असता या पेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही. मला जे काही बोलायचे आहे ते मी या आधीच बोललो आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार की भाजपसोबत जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

तीन जानेवारीला फडणवीस-भुजबळांची बैठक?

दरम्यान, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तीन जानेवारीला सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे पुढील बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  3 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत.  छगन भुजबळ यांची भूमिका या बैठकीनंतर निश्चित होणार असल्याची समजते. 

आणखी वाचा 

laxman Hake On Chhagan Bhujbal: लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांना इशारा; म्हणाले, छगन भुजबळांवर अन्याय होत असेल तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Sameer Bhujbal : मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : आठ दहा दिवसांनंतर पुन्हा भेटून मार्ग काढू, फडणवीसांच्या भेटीत काय झालं?DCM Eknath Shinde :  शेताच्या बांधावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 23 डिसेंबर 2024: ABP MajhaPune Wagholi Accident : पुण्यात अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Sameer Bhujbal : मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Brazil Aircraft Crash : विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
Embed widget