आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले
गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित असलेल्या संकेत नावाच्या तरुणाने 112 वर डायल करून पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी अवस्थेत दोघांना जिल्हा रुग्णालयात नेले.
Muzaffarnagar : गेल्या 8 वर्षांपासून एका तरुणासोबत प्रेमसंबंध असूनही जेव्हा प्रियकराला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे असल्याची बातमी प्रेयसीला समजली. यानंतर प्रेयसीने प्रियकराला शेवटचे भेटायला बोलावले, यानंतर दोघेही बराच वेळ गेस्ट हाऊसमध्ये होते. यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. यानंतर अचानक चाकू काढत प्रेयसीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला. या हल्ल्यात प्रेयसीच्या सुद्धा अंगठ्याला दुखापत झाली आहे.
गेस्ट हाऊसमध्ये बोलावून त्याच्या गुप्तांगावर कटरने वार
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. प्रेयसी 22 वर्षीय असून जेव्हा तिला कळले की प्रियकराचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी निश्चित झाले आहे. तेव्हा हिना नावाच्या प्रेयसीने 24 वर्षीय प्रियकर एहतेशाम अहमदला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. यामध्ये प्रेयसीच्या अंगठ्याला सुद्धा दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रेयसीला अटक केली आहे.
हिनाने काटा काढण्याचा निर्णय घेतला
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी हे प्रकरण उघडकीस आले जेव्हा हिनाने एहतेशाम अहमदला मुझफ्फरनगरमधील एका गेस्टहाऊसमध्ये बोलावले, जिथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. सुमारे आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडप्याला एहतेशमने दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्याच्या ठरलेल्या लग्नाची माहिती मिळताच हिनाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात हिनाने प्रियकर अहमदला धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.
तरुणाचे लग्न महिनाभरापूर्वी दुसऱ्या तरुणीसोबत निश्चित
गेस्ट हाऊसमध्ये उपस्थित असलेल्या संकेत नावाच्या तरुणाने 112 वर डायल करून पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी अवस्थेत दोघांना जिल्हा रुग्णालयात नेले. मुलीच्या हातालाही दुखापत झाली आहे. सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याने सांगितले की, तरुणाचे लग्न महिनाभरापूर्वी दुसऱ्या तरुणीसोबत निश्चित झाले होते.
दरम्यान, अहमदची प्रकृती चिंताजनक आहे. गुप्तांग कापून टाकण्यात आल्याने प्रकृती गंभीर आहे. या घटनेदरम्यान हिनाने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली असून हिनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भावनिक त्रास आणि विश्वासघातातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासत आहेत. तपासाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या