रोहित शर्मा स्पेशल... 147 किमी वेगाच्या चेंडूला पाठवले सिमापार, व्हिडीओ व्हायरल
IPL 2023 , Rohit Sharma six : दिल्लीने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली.

IPL 2023 , Rohit Sharma six : दिल्लीने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 7.3 षटकात 71 धावांची भागिदारी केली. मागील दोन सामन्यात मुंबईची फलंदाजी ढासळली होती, पण आजच्या सामन्यात मुंबईच्या सलामी फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा याने आज आक्रमक फलंदाजी केली. त्याने ललीत यादव, एनरिख नॉर्जे आणि मुकेश कुमार यांना गगनचुंबी षटकार मारले. यामधील एक षटकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माने एनरिख नॉर्जे याच्या 147 किमी वेगाने आलेल्या चेंडूला सिमापार पाठवले. हा शॉट इतका परफेक्ट होता... की बॅटला चेंडू लागल्यानंतर त्यावर षटकार असेच लिहिलेले होते. रोहित शर्माने एनरिख नॉर्जे याला मारलेला षटकार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याचे कौतुक होतोय.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ
रोहित शर्मा स्पेशल.........#DCvsMI #RohitSharma #DavidWarnerpic.twitter.com/QznLA4d2vD
— एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) April 11, 2023
रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 71 धावांची सलामी भागिदारी केली. इशान किशन 31 धावांवर धावबाद झाला. पण रोहित शर्माने दुसऱ्या बाजुला धावसंख्या वाढवली. रोहित शर्मा याने एनरिख नॉर्जे याला मारलेला षटकार चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर रोहित शर्माचे कौतुक होते. रोहित शर्मा याने पहिल्यापासूनच आक्रमक रुप धारण घेतले. त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले आहेत.
Superb from captain Rohit Sharma. pic.twitter.com/JmGvnAoIOt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023
Rohit Sharma special tonight - a six against Anrich Nortje on a 147.2kmph delivery. pic.twitter.com/S5IHxl3QeL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2023
मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीला 20 षटके फलंदाजीही करता आली नाही. पीयुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ या दोघांनी दिल्लीच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. तर रिले मेरेडिथ याने दोन विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी 173 धावांची गरज आहे.
अक्षर पटेलची झंझावाती फलंदाजी -
दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत जात होते. त्यावेळी अक्षर पटेल यांनी चित्र बदलले. अक्षर पटेल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. अक्षर पटेल याला बेहरनडॉर्फ याने बाद केला. अक्षर पटेल याने 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत अक्षर पटेल याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. अक्षर पटेल याने डेविड वॉर्नर याच्यासोबत 35 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. यामध्ये अक्षर पटेल याचे योगदान 54 धावांचे होते.




















