(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LSG vs PBKS Match Highlights : सिकंदरची अष्टपैलू खेळी, शाहरुखचा फिनिशिंग टच; पंजाबचा लखनौवर दोन विकेटने विजय
IPL 2023 : सिकंदर रजाची अष्टपैलू खेळी आणि शाहरुख खानच्या फिनिशिंगच्या जोरावर पंजाबने लखनौचा दोन विकेटने पराभव केला.
LSG vs PBKS IPL 2023 Match 21: सिकंदर रजाची अष्टपैलू खेळी आणि शाहरुख खानच्या फिनिशिंगच्या जोरावर पंजाबने लखनौचा दोन विकेटने पराभव केला. लखनौने दिलेले 160 धावांचे आव्हान पंजाबने दोन विकेट राखून पार केले. अटीतटीच्या लढतीत पंजाबकडून सिकंदर रजा याने अर्धशतकी खेळी केली. तर शाहरुख खान याने फिनिशिंग टच दिला..
सिकंदर रजाची अष्टपैलू खेळी -
160 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली होती. दबावात असताना सिकंदर रजा याने आक्रमक खेळी केली. सिकंदर रजा याच्या अष्टपैलू खेळीमुळे पंजाबने लखनौचा पराभव केला. सिकंदर रजाने अर्धशथकी खेळी केली. त्याशिवाय गोलंदाजीत एक विकेटही घेतली. सिकंदर रजा याने 41 चेंडूत 57 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. सिकंदर रजा याने पंजाबची धावसंख्या हालती ठेवली.
शाहरुखचा फिनिशिंग टच -
लागोपाठ विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव गडगडला होता. अखेरच्या क्षणी शाहरुख खान याने दहा चेंडूत २६ धावांची खेळी करत पंजाबला विजय मिळवून दिला. शाहरुख खान याने या खेळीत दोन षटकार आणि एक चौकार लगावला. रवी बिश्नोई याला चौकार लगावत शाहरुख खान याने पंजाबला विजय मिळवून दिला.
पंजाबच्या इतर फलंदाजांची कामगिरी कशी -
१६० धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे आणि प्रभसिमरन स्वस्तात माारी परतले... दोघांनी दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. अथर्व शून्यावर तर प्रभसिमरन चार धावांवर बाद झाला.. त्यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि हरप्रीत सिंह यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मॅथ्यू शॉर्ट ३४ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मॅथ्यू शॉर्ट बाद झाल्यानंतर हरप्रीत सिंहही लगेच बाद झाला. त्याने २२ धावांची खेळी केली. त्यानंतर सॅम करन यालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. सॅम करन अवघ्या सहा धावांवर बाद झाला. तर जितेश शर्मा दोन धावांवर बाद झाला.. हरप्रीत ब्रार याने सहा धावांचे योगदान दिले.
लखनौची गोलंदाजी कशी ?
लखनौकडून रवी बिश्नोई, मार्क वूड आणि युद्धवीर सिंह यांनी भेदक मारा केला. या तिघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.. तर कृष्णाप्पा गौतम आणि कृणाल पांड्या यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
सॅम करनचा भेदक मारा, राहुलचे अर्धशतक -
कर्णधार सॅम करन आणि कगिसो रबाडा यांच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा संघाने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंत मजल मारली. लखनौकडून कर्णार केएल राहुल याने 74 धावांची खेळी केली. राहुलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक गमावून प्रथम फंलदाजी करताना लखनौने वादळी सुरुवात केली. केएल राहुल आणि काइल मायर्स यांनी धावांचा पाऊस पाडला. विशेषकरुन मायर्स याने पावरप्लेमध्ये धावांची लयलूट केली. मायर्स याने 23 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. राहुल आणि मायर्स यांनी पहिल्या विकेटसेठी 53 धावांची भागिदारी केली. मायर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा याला मोठी खेळी करता आली नाही. हुड्डा दोन धावा करुन तंबूत परतला. त्याला सिकंदर रजा याने बाद केले.
केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांनी लखनौचा डाव सावरला. राहुल आणि पांड्या यांनी संयमी फलंदाजी करत लखनौची धावसंख्या हालती ठेवली. पण रबाडाने एकाच षटकात लखनौला दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. रबाडाने सेट झालेल्या कृणाल पांड्याला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेला निकोलस पूरनला शून्यावर तंबूत धाडले. लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे लखनौची धावगती मंदावली. त्यातच मोक्याच्या क्षणी सॅम करन याने धोकादायक मार्कस स्टॉयनिस याला बाद करत लखनौच्या अडचणीत आणखी वाढ केली.
राहुलचे संयमी अर्धशतक -
एकीकडे लखनौचे फलंदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकत असतानाच दुसरीकडे केएल राहुल याने संयमी फलंदाजी केली. केएल राहुल पहिल्या चेंडूपासूनच धावसंख्या हालती ठेवत फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूला सातत्याने विकेट पडत असल्यामुळे राहुल याचा स्ट्राईक रेटही घसरला होता. राहुल याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण अर्शदीप याने राहल याला बाद केले. राहुल याने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत राहुलने एक षटकार आणि आठ चौकार लगावले.
पंजाबचा भेदक मारा -
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने लखनौच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले. पंजाबच्या गोलंदाजांनी लखनौला मोठी भागिदारी करु दिली नाही. सॅम करन, अर्शदीप, सिकंदर रजा, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्रार यांनी अचूक टप्प्यावर मारा केला आहे. सॅम करन यने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर कगिसो रबाडा याने दोन जणांना तंबूत पाठवले. अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
राहुलने मोडला गेलचा विक्रम -
केएल राहुल यान दमदार अर्धशतकी खेळी करत आयपीएलमध्ये चार हजार धावांचा पल्ला पार केला. राहुल याने 105 डावात चार हजार धावांचा पल्ला पार केला. यासह राहुल याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चार हजार धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम केलाय. राहुलने युनिवर्स बॉस केएल राहुल याचा विक्रम मोडीत काढलाय. ख्रिस गेल याने ११२ डावात चार हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. पण आज राहुलने हा विक्रम मोडला. राहुल याने अवघ्या १०५ डावात चार हजार धावा केल्या आहेत.