(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : टेन्शन काय को लेने का? 'जोफ्रा' आहे ना भाऊ; मुंबई इंडियन्सने प्रॅक्टिसचा दमदार व्हिडीओ केला शेअर
MI Jofra Archer in IPL 2023 : मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरच्या दमदार गोलंदाजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या मुंबई संघ सराव करत आहेत.
IPL 2023, Mumbai Indians Practice Session : मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएलची जोरदार तयारी सुरु आहे. गेल्या हंगामातील निराशाजनक कामगिरीची भरपाई करण्यासाठी मुंबई संघ मैदानावर चांगलाच घाम गाळताना दिसत आहे. फलंदाज, गोलंदाज प्रॅक्टिस करत आहेत. रोहित शर्मापासून (Rohit Sharma) ते जोफ्रा आर्चरपर्यंत (Jofra Archer) सर्वजण फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करत आहेत.
जोफ्रा आर्चरच्या दमदार गोलंदाजीचा व्हिडीओ
दरम्यान, यंदा सर्वांचं लक्ष मुंबईचा खेळाडू जोफ्रा आर्चरकडे लागलं आहे. जोफ्रा आर्चर गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. जोफ्रा दमदार गोलंदाजी करतानाचा सरावाचा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जोफ्राचा व्हिडीओ शेअर करताना मुंबई संघाने 'मुंबईच्या रंगात जोफ्राची पहिली ओव्हर'
पाहा मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडीओ...
"Post bowling video Admin" - Presenting Jofra चा पहिला over in MI colors 😍💙#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @JofraArcher MI TV pic.twitter.com/h2Y1KvEV1O
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2023
बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रावर जबाबदारी
यंदा मुंबई संघाचा स्टार गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर मुंबई संघात गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी आहे. बुमराह नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या चाहत्यांना जोफ्राकडून अपेक्षा आहेत.
बुमराह आयपीएलमधून बाहेर
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह महत्वाचा खेळाडू आहे. पण, दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह बाहेर गेल्यामुळे मुंबईची गोलंदाजी कमकुवत झाली होती. बुमराहची रिप्लेसमेंट शोधणं मुंबईसाठी कठीण होतं. पण जोफ्रा आर्चर संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्यामुळे मुंबईचं टेन्शन कमी झालं आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. गतवर्षी आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला खरेदी केले होते. पण दुखापतीमुळे गेल्या हंगामात आर्चर आयपीएलला मुकला होता. आता या हंगामात तो मुंबईकडून खेळणार आहे.
गेल्या वर्षी मुंबईची खराब कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाचा 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तर फक्त चार सामने जिंकता आले होते. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.