IPL 2023, MI vs RCB : आरसीबीच्या सपोर्टसाठी सद्गुरु 'मैदानात', मुंबईचा आठ विकेटने पराभव
IPL 2023, MI vs RCB : आरसीबीने मुंबईचा आठ विकेटने पराभव करत आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली.
IPL 2023, MI vs RCB : आरसीबीने मुंबईचा आठ विकेटने पराभव करत आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. मुंबईविरोधातील सामन्यात आरसीबीच्या सपोर्टसाठी सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) आले होते. मुंबईच्या फलंदाजीवेळी सद्गुरु जग्गी आरसीबीला सपोर्ट करता दिसले. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सद्गुरु यांचा आयपीएल पाहातानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इशा फाऊंडेशनचे प्रमुख सद्गुरु जग्गी यांनी आज एम चिन्नास्वामी स्टेडिअवर हजेरी लावली होती. पहिल्या डावात ते आरसीबीला सपोर्ट करताना दिसले. आरसीबीच्या गोलंदाजांनी मुंबईची दाणादाण उडवली तेव्हा सद्गुरु टाळ्या वाजवून दाद देत असल्याचे दिसले. 65 वर्षीय सद्गुरु बेंगलोरमधील आपल्या सहकाऱ्यासोबत सामना पाहायला आल्याचे समजतेय. आयपीएलचा सामना पाहातानाचे सद्गुरु यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Rcb won today coz sadhguru came to watch the match 👍
— 🤖 (@wtfprincu) April 2, 2023
Sadhguru supporting RCB from the stands. pic.twitter.com/I0v3IKdkEi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2023
GOAT franchise
— 𝐂𝐚𝐩.𝐀𝐦𝐞𝐫𝐢𝐜𝐚 (@GV0208) April 2, 2023
GOAT supporter#RCBvMI pic.twitter.com/TttgPbtvqL
#Sadhguru clapping for #rcb#TATAIPL2023 #RCBvMI #ViratKohli #FafDuPlessis #tilakverma pic.twitter.com/WUyLNKuUHL
— भारत जयतु (@CopdCopy95319) April 2, 2023
When the king plays on Sunday shri Sadhguru had to come. 🙏❤️#MIvsRCB ❤️👑 #ViratKohli𓃵 pic.twitter.com/8CB7UoZRx9
— Cricketopia🇮🇳 (@cricketopia17) April 2, 2023
Sadhguru supporting RCB from the stands 🙏🏻
— InsideSport (@InsideSportIND) April 2, 2023
#RCBvMI #CricketTwitter #IPL2023 #SadhGuru pic.twitter.com/Fktkx2B69Y
2021 kkr vs csk final match.. Kkr management asked sadhguru to bless kkr team.. But he denied coz he was a ms fan..
— Shivram Shet (@2006Shet) April 2, 2023
Beerbiceps before, Sadhguru now what did my Kohli do to deserve this https://t.co/yjSDAMf3bV
— Abhishek|अभिषेक (@agnosticabhi) April 2, 2023
Sadhguru supporting ambani v/s sadhguru supporting the team playing against ambani's team. pic.twitter.com/3EG7VrlvVP
— जतिन सचदेव (@iamjatinn__) April 2, 2023
दरम्यान, तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही. मुंबईने दिलेल्या 172 धावांचा आव्हानाचा पाठलाग आरसीबीने सहज केला. विराट कोहली आणि फाफ यांनी तुफानी अर्धशतके झळकावली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले. मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
आणखी वाचा :
MI vs RCB, Match Highlights : पहिला सामना देवाला! आरसीबाचा मुंबईवर 8 विकेटने विजय