एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

MI vs RCB, Match Highlights : पहिला सामना देवाला! आरसीबाचा मुंबईवर 8 विकेटने विजय

IPL 2023, MI vs RCB : विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला.

IPL 2023, MI vs RCB : विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले.  मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.

विराट-फाफचे वादळ - 

विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या फलंदाजीपुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी दिसत होती. या दोघांच्या फटकेबाजीपुढे मुंबईच्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकात 148 धावांची भागिदारी केली. या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फाफ डु प्लेसिस याने 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद होता. 

बुमराहची कमी जाणवली - 

171 धावांचा बचाव करताना मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. मुंबईच्या गोलंदाजीत बुमराहच्या धारधार गोलंदाजीची कमी दिसत होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजामध्ये धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. 

जोफ्राची प्रभावहीन गोलंदाजी - 

बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. पण जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीत धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ यांनी जोफ्राची पिटाई केली. जोफ्राच्या चार षटकात दोघांनी 33 धावा वसूल केल्या. 

अरशद खान आणि कॅमरुन ग्रीन यांना विकेट - 
मुंबईकडून अरशद खान आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. अरशद खान याने फाफ याचा अडथळा दूर केला. तर कॅमरुन ग्रीन याने दिनेश कार्तिकला बाद केले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजी प्रभावहीन ठरली.  जेसन बेहरडॉफ, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, ऋतिक शौकिन यांना विकेट घेता आली नाही आणि धावाही रोखता आल्या नाहीत. पियुष चावला याने 4 षटकात फक्त 26 धावा दिल्या पण विकेट घेता आली नाही. 

दरम्यान, तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही.  

तिलक वर्माची एकाकी झुंज - 

मुंबई इंडियन्सचा गेल्या हंगामातील हिरो तिलक वर्मा याने  यंदाच्या हंगामतील पहिल्याच सामन्यात झुंझार खेळी केली. तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक झळकावले. एका बाजूला विकेट पडत तिलक वर्मा याने संयमी आणि आक्रमकपणे अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने नेहाल वढेरासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने दबावात अर्धशतक झळकावले. तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. 

रोहित शर्माची खराब खेळी  -

कर्णधार रोहित शर्माला कर्णधाराला साजेशी फलंदाजी करता आली नाही. इशान किशन आणि कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट फेकली. रोहित शर्माने दहा चेंडूचा सामना करताना फक्त एक धाव केली. आकाशदीपने रोहित शर्माला बाद केले. 

ईशान-सूर्या फ्लॉप - 

ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ईशान किशन याने 13 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. मोहम्मद सिराज याने ईशान किशनचा अडथळा दूर केला. जगातील आघाडीचा टी 20 खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. ब्रेसवेल याने सूर्याचा अडथळा दूर केला. ऋतिक शौकिन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो पाच धावा काढून तंबूत परतला. 

नेहाल वढेराची छोटेखानी खेळी - 

युवा नेहाल वढेरा यांनी 21 धावांची ताबोडतोड खेळी केली. नेहाल शर्मा याने 13 चेंडूत 21 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर नेहाल वढेरा याने दोन षटकार आणि एका चौकारासह मुंबईची धावसंख्या वाढवली. 

कॅमरुन ग्रीन-टीम डेविड स्वस्तात बाद - 

विस्फोटक फलंदाज टीम डेविड आणि कॅमरुन ग्रीन स्वस्तात बाद झाले. या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. टीम डेविड 4 तर ग्रीन पाच धावांवर बाद झाला. ग्रीनला रीस टोप्लीने तर टीम डेविड याला कर्ण शर्माने तंबूत पाठवले.  

मोहम्मद सिराजचा भन्नाट स्पेल - 

फॉर्मात असलेल्या मोहम्मद सिराज याने आयपीएल 16 च्या पहिल्याच सामन्यात भेदक मारा केला. सिराजने पॉवरप्लेमध्ये तीन षटके कंजूष गोलंदाजी केली. सिराजने तीन षटकात अवघ्या पाच धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. मोहम्मद सिराज याने इशान किशन याचा अडथळा दूर केला. पण अखेरच्या षटकात सिराज याने पाच वाईड फेकत धावा लुटल्या. सिराजने अखेरच्या षटकात 16 धावा दिल्या. यामध्ये पाच अतिरिक्त धावा आहेत. सिराजने चार षटकात 21 धावा देत एक विकेट घेतली. 

कर्ण शर्माने चार षटकात 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. रीस टोप्ली याने दोन षटकात 14 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. ब्रेसवेल याने दोन षटकात 16 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. अकाशदीप याने दोन षटकात 29 धावां खर्च करत एका फलंदाजाला तंबूत पाठवले.  हर्षल पटेल याने चार षटकात 43 धावा खर्च करत एक विकेट घेतली. 

रीस टोप्ली दुखापतग्रस्त -
आरसीबाचा वेगवान गोलंदाज रीस टोप्ली दुखापतग्रस्त झाला आहे. फिल्डिंग करताना रीस टोप्ली याच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर होती, त्यामुळे रीस टोप्ली याला मैदानाबाहेर जावे लागले. रीस टोप्ली याच्यावर फिजिओ उपचार करत आहेत. रीस टोप्ली याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. याआधीच दुखापतीमुळे गुजरातला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसन संपूर्ण आयपीएलला मुकला आहे. आता आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget