एक्स्प्लोर

IPL 2023: गौतम गंभीर दुश्मन का दुश्मन और यारों के यार... कोहलीशी भांडण, तर रोहितशी 'प्यार'

IPL 2023, MI vs LSG: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वी झालेली गौतम गंभीर आणि रोहित शर्माची भेट विशेष चर्चेत आहे.

IPL 2023, MI vs LSG: गौतम गंभीर... आयपीएलमधील (IPL 2023) विराट कोहलीशी झालेल्या बाचाबाचीमुळे अजुनही चर्चेत आहे. काहीना काही कारणांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारा गौतम आपल्या नावाप्रमाणे नेहमीच गंभीर असतो. पण मंडळी हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) कधी कधी हसतोही, बरं का... हो हसण्यात जरासा कंजुसपणा तो दाखवतो, पण तो त्याचा स्वभावच आहे म्हणा. त्यामुळे त्याच्या या स्वभावाला त्याचा अहंकार म्हणता येणार नाही. आयपीएलमधील लखनौचा सर्वेसर्वा म्हणजे, गौतम गंभीर, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान, तो भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार आणि त्याचा ज्युनियर विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी भिडला. दोघांमध्ये तु-तू, मैं-मैं झाली. पण या भांडणात व्हिलन ठरला तो मात्र गंभीरच... 

स्वभावानं तसा रागीट असलेल्या गंभीरचं अनेक बाबतीत टायमिंग चुकलंच. त्यामुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही अडकला. मात्र आता याच मिस्टर गंभीरचा एक वेगळा अंदाज समोर आला आहे. आयपीएलच्या मैदानात गौतम टीम इंडियाचा कर्णधार आणि धमाकेदार ओपनिंग बॅट्समन रोहित शर्माला (Rohit Sharma) कडकडून मिठी मारताना दिसतोय. लखनौनं आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "वेलकम टू लखनौ, रोहित"

रोहित आणि गंभीरची भेट लखनौमध्ये एकाना अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये झाली. आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर किंग्समध्ये सामना रंगणार आहे. त्यानिमित्त मुंबईचा संपूर्ण संघ लखनौमध्ये दाखल झाला. त्याचवेळी नेहमीच गंभीर असणाऱ्या गौतमनं यावेळी मात्र रोहितचं आपल्या चेहऱ्यावरच्या गोड स्माईलनं स्वागत केलं. 

व्हिडीओमध्ये गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यातील बॉन्डिंग दिसून येतंय. दोघांच्याही चेहऱ्यावर मोठं हास्य आहे. 24 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला एक सॉफ्ट गाणंही वाजतंय. व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला. व्हिडीओवर काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. गंभीर आणि रोहितच्या या बॉन्डचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. पण भविष्यात भूतकाळ डोकावला नाही, तर मग काय बोलायचं.... काहीजण विराटसोबत झालेली बाचाबाची आणि रोहितसोबतची ही गळाभेट या दोन्ही घटनांची सांगड घालत आहेत. 

गौतम गंभीर म्हणजे, टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक. यारों का यार, अशीही क्रिडा विश्वात गौतमची ओळख आहे. खरं तर मुळातच गंभीर स्वभावाच्या असलेल्या टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूचं मुळातच फार कमी लोकांशी जमतं. हा पण ज्यांच्याशी जमतं त्यांच्यासाठी तो काहीही करताना मागेपुढे पाहत नाही. 2007 आणि 2011 चा वर्ल्डकप विनिंग टीमचा भाग असलेल्या गौतम गंभीरचे महेंद्रसिंह धोनीसोबतचे मतभेद जगजाहीर आहेत. पण, युवराज सिंह, हरभजन सिंह, जहीर खान हे टीम इंडियाचे माजी खेळाडू आजही त्याचे जिगरी आहेत. 

गौतम आणि विराट भर मैदानात भिडल्यानंतर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यातील एक म्हणजे, दोघेही 'Delhi Boyes' असल्याची. गौतम आणि विराट दोघेही दिल्लीचेच, विराट गौतमचा ज्युनिअर, पण तरीही विराटसोबत मात्र गंभीरचे सूर काही जुळत नाहीत. काही दिवसांपूर्वीच्या लखनौ विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यात ते आपण सर्वांनी पाहिलंच. हो पण टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मासोबत मात्र गौतम गंभीरचे सूर फार चांगले जुळतात. रोहितही गंभीरला मोठ्या भावाप्रमाणे मान देताना दिसतो. पण कदाचितच कोणाला माहित असेल की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातही अनेक मतभेद आहेत. दोघांमधील कुरबुरीही दबक्या आवाजात नेहमीच चर्चेत असतात. 

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Embed widget