'दुनिया हिला देंगे हम', मुंबईची पलटन सज्ज! RCB विरोधात कशी असेल मुंबईची प्लेईंग 11?
Mumbai Indians Probable Playing 11 : गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई यंदा दमदार कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल.
IPL 2023, Mumbai Indians Probable Playing 11 : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये रविवारी संध्याकाळी सामना रंगणार आहे, बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या हंगामात मुंबईची कामगिरी निराशाजनक राहिली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई यंदा दमदार कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. आरसीबीविरोधात मुंबईच्या संघात कुणाला संधी मिळू शकते... प्लेईंग 11 कशी असू शकते... याबाबत पाहूयात.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईचा संघ मजबूत दिसत आहे. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांच्यासारखे तगडे आणि विस्फोटक खेळाडू मुंबईच्या ताफ्यात आहेत. हे खेळाडू प्रतिस्पर्धी संघावर भारी पडू शकतात. त्याशिवाय जोफ्रा आर्चर, जेसन बेहनडॉर्फ आणि कुमार कार्तिकेय यांच्यासराखे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. आयपीएल 2023 मध्ये मुंबईचा संघ नव्या जोश आणि उमेदीने मैदानात उतरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई पाच वेळा आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली आहे. यंदा आयपीएलवर नाव कोरत जेतेपदाचा षटकार लावण्याच्या इराद्याने रोहित सेना उतरेल..
आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बुमराह बाद झालाय, हा मुंबईला मोठा धक्का मानला जातोय. बुमराह पाठदुखीमुळे सहा महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानाबाहेर आहे. नुकतीच न्यूझीलंडमध्ये त्याच्यावर सर्जरी झाली. विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुश्कीही बुमराहवर आहे. पण सध्या मुंबईने बुमराहची रिप्लेसमेंट शोधली आहे. त्याशिवाय झाय रिचर्डसन दुखापतग्रस्त झालाय, हाही मुंबईला मोठा धक्का मानला जातोय.
बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रावर जबाबदारी
यंदा मुंबई संघाचा स्टार गोलंदाज बुमराह दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर मुंबई संघात गोलंदाजीची महत्त्वाची जबाबदारी आहे. बुमराह नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या चाहत्यांना जोफ्राकडून अपेक्षा आहेत.
मुंबईची प्लेईंग कशी असू शकते -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, कॅमरून ग्रीन, रमनदीप सिंह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहनडॉर्फ, ऋतिक शौकीन.
गेल्या वर्षी मुंबईची खराब कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी पाहायला मिळाली होती. मुंबई इंडियन्सच्या संघाचा 14 सामन्यांपैकी 10 सामन्यांमध्ये पराभव झाला होता, तर फक्त चार सामने जिंकता आले होते. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 16 व्या हंगामात नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
मुंबईला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट, अखेरच्या क्षणी या खेळाडूला घेतले ताफ्यात
आला रे आला जोफ्रा आर्चर आला, मुंबईने प्रॅक्टिसचा व्हिडीओ केला शेअर